वाकण:

   नागोठणे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या येथील कनिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक  प्राध्यापक लाडजी मेहबूबसाहब बागवान यांना नुकतेच वसंतराव डावखरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी सौ. निलिमा डावखरे यांच्या हस्ते बागवान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आर.आर. देशमुख, ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.लाडजी बागवान हे गेली २५ वर्षे शैक्षणिक सेवा करीत आहेत.

   त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल लाडजी बागवान यांचे नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समदशेठ अधिकारी, उपाध्यक्ष अ. सलाम अधिकारी, सचिव लियाकतशेठ कडवेकर, मुख्याध्यापक ईरशाद कुनके, शब्बीर पानसरे, समीर अधिकारी, सौ. सादिया दफेदार, कोकण विभागीय शिक्षक वृंद आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

अवश्य वाचा