अलिबाग :

   महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा ठाणे येथील ज्येष्ट साहित्यीक/विचावंत डॉ.जयप्रकाश घुमटकर यांना महाराष्ट्र भूषण, कोकणचे लोकप्रिय दैनिक कृषीवल साठी-आदर्श वृत्तदर्पण (संस्था पुरस्कार), सहकार/शैक्षणिक सह विविध क्षेत्रातील अलौकीक कार्याप्रती दि सांगली वैभव को.ऑप.क्रे.सोसा.चे अध्यक्ष पी.आर.पाटील-बापू यांना आदर्श जीवन गौरव, देशातील महिलांचे धाडसी नेतृत्व, भूमाता ब्रीगेड च्या अध्यक्षा सौ.तृप्तीताई देसाई यांना प्रियदर्शिनी अस्मिता सन्मान, मुंबईच्या सहकारातील नवदुर्गा सौ.रिमाताई मोहीते यांना प्रियदर्शिनी अस्मिता सन्मान, तसेच  सांस्कृतिक क्षेत्रातील अलौकीक कार्याप्रती ख्यातनाम कलाकार वैशाली काळे-नगरकर यांना आदर्श लावणी सम्राज्ञी पुरस्काराने आज गौरविण्यात येणार. अशी माहीती संस्थाध्यक्ष राजीव लोहार यांनी दिली.

   रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते 1-30 या वेळेत, 16 वा राज्यस्तरीय गौरव समारंभ-पुरस्कार प्रदान सोहळा अलिबाग येथील पी.एन.पी. नाट्यगृहात डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या अध्यक्षतेखाली, व महाराष्ट्राच्या माजी मंत्री,शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षीताई पाटील, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड.आस्वाद पाटील,  महाराष्ट्राची रणरागीणी भूमाता ब्रीगेड अध्यक्षा तृप्तीताई देसाई, पी.एन.पी.सांस्कृतिक कला मंडळ अलिबागच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखाताई पाटील, विश्वविक्रमविर, सुप्रसिध्द अक्षर गणेश कलाकार राज कांदळगांवकर, संस्थाध्यक्ष डॉ.राजीव लोहार, महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई लोहार,व निवड समिती अध्यक्षा डॉ.मुग्धा रेठरेेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.प्रथम सत्रात सकाळी 10-30 ते 11-45 या वेळेत विविध नृत्य, मनोरंजन, कला आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणेची प्रसिध्द युवा कलाकार निर्मिती धर्माधिकारी नृत्य सादर करणार आहे. अलिबागचे लोकप्रिय हास्यकलाकार प्रफुल्ल पाटील हे समारंभानिमित्त खास (हसाल तर हसाल) हा एकपात्री प्रयोग सादर करनार आहेत.  

    व्दितीय सत्रात मुख्य पुरस्कार प्रदान समारंभ सपन्न होईल. दिपप्रज्वलन, प्रतिमापूजन कार्यक्रमाची सुरवात होईल. संस्थेचे गौरव समारंभ आयोजनाचे हे 16 वे वर्ष असून राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मराठवाडा व विदर्भ विभागातील आदर्श व्यक्तीमत्वांना यंदा सन्मानित करणेत येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द निवेदक पत्रकार विजय लोहार हे करणार आहेत. या निमित्ताने दिपावली विशेष गौरव विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करणेत येणार आहे.

अवश्य वाचा