गणराज प्रबोधन मंडळ आणि रायगड कीर्तन संकुल यांच्यातर्फे २३ नोव्हेंबर ते ०७ डिसेंबर रोजी रोज सायंकाळी ०६.३० ते ०८ या वेळेत  श्रीराम मंदिर,ब्राह्मण आळी,अलिबाग येथे संतबोध कीर्तनमालेचे आयोजन केले आहे.या कीर्तनमालेत रायगड जिल्ह्यच्या विविध भागातील वेगवेगळ्या वयोगटांचे कीर्तनकार कीर्तनसेवा देणार आहेत. मनोरंजनाबरोबर समाजाचे प्रबोधन करणारी कीर्तन परंपरा टिकावी आणि वाढावी हा या कीर्तनमालेच्या आयोजनाचा उद्देश आहे. त्याच बरोबर महाराष्ट्राला उज्ज्वल अशी संत परंपरा लाभली आहे. आज २१ व्या शतकातही संतांच्या शिकवणीचा समाज मनावर अनन्य साधारण प्रभाव आहे.

   तरी सेवाभाव,भक्तीभाव,प्रामाणिकपणा, नीतिमत्ता चारित्र्य इत्यादी उच्च मानवी मूल्य समाजात वाढावीत यादृष्टीने रोज एक संत चरित्र कीर्तनातून सांगितले जाणार आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत तुकाराम,संत रामदास, संत सावतामाळी इत्यादी १५ संताची चरित्र ऐकण्याची पर्वणी कीर्तनमालेच्या माध्यमातून श्रोत्यांना मिळणार आहे. सर्व कीर्तनांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अवश्य वाचा