पनवेल :

   पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी व सुरेश गांगरे यांनी पनवेल प्रभाग समिती अंतर्गत तक्का, भिंगारी, मार्केड यार्ड आदी परिसरातील अतिक्रमण केलेल्या तब्बल ४० दुकानगाळ्यांवर तसेच पत्र्याच्या शेडवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मंगळवारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात करण्यात आली.

   पनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का येथील 2 भंगार दुकाने, पत्राशेड, भिंगारी येथील सोहम हाॅटेल जवळील पत्राशेड, अनधिकृत 7 दुकानगाळे, एपीएमसी मार्केट जवळील 20 शेडवजा गाळे तोडण्यात आले.तसेच उरणनाका येथील 1 शेड अशा सुमारे 40 अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक श्री.पवार यांचेसह सुमारे 20 पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त आणि महानगरपालिकेचे 40 कर्मचारी यांचा कडेकोट पहारा यावेळी होता. यावेळी अतिक्रमणाबाबत झिरो टाॅलरन्स या धर्तीवर कोणतेही अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही. तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा करून अतिक्रमण निष्कासन मोहीम अशीच सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उप आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी बोलताना दिली.

अवश्य वाचा