मुंबई :

   सर्वसामान्य प्रवाशांना खास लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी
आधुनिक तंत्रज्ञान व अधिक सुखसोयींनी युक्त अशी विना वातानुकूलित (non
ac) शयन-आसन (sleeper - sitter)   व्यवस्था असलेल्या नवीन बसचा लोकार्पण
सोहळा परळ बसस्थानकात सर्वसामान्य प्रवासी श्री. रोहित धेंडे यांच्या  
हस्ते व  एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजित
सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ बस आगारात परेल-भटवाडी (पाटगांव
) ही बस सोडून संपन्न झाला.एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार/मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी,
वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज
सरासरी ६७ लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी
महामंडळामार्फत पुरविली जाते. त्यापैकी पहिल्या रातराणी बस सेवेचा
प्रारंभ २० एप्रिल १९६८ रोजी जळगांव - पुणे या मार्गावर एसटी बस सुरु
करून करण्यात आला.

   सध्या राज्यभरात २५६ मार्गावर ५१२ बसेसद्वारे रातराणी
सेवा दिली जाते.शयन-आसन व्यवस्था व तिकीट दररात्रीचा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशी शयन बसेसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने ३०
पुश बॅक आसने व १५ प्रशस्त शयन  (बर्थ) असलेली बस चालनात आणली आहे. या
बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) सध्या चालनात असलेल्या निम आराम
म्हणजे हिरकणी बसच्या तिकीट दरा इतका असणार आहे

अवश्य वाचा