उरण

   सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी 1985 बॅचचे गेट2गेदर रविवार दि. 17 रोजी चिरनेरमधील आक्कादेवी येथील राजेंद्र म्हात्रे यांच्या फार्म हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात आणि शानदार स्वरूपात सम्पन्न झाले.यावेळी या वर्गातील 24 विद्यार्थी आणि 4  विद्यार्थिनी असे एकूण 28 जण उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात गणेशस्तवनाने झाली. उपस्थितांचे स्वागत या ग्रुपमधील माजी न्यायाधीश चंद्रहास म्हात्रे यांनी केले. यानंतर हास्यसम्राट संजय मोकल याने सर्वाना पोट धरून हसवले. या ग्रुपमधील गायक प्रकाश फोफेरकर, विजय मुंबईकर यांनी मै शायर तो नही, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ,कानडा राजा पंढरीचा , बाई मी वसईची फुलवाली, बने चाहे दुश्मन जमाना हमारा  सलामत रहे दोस्ताना हमारा, यारा 'तेरी यारी को गाणी गायले. मिलिंद खारपाटील यांनी चिरनेर गावावर रचलेली आणि गायलेली कविता सर्वाना भावली.पन्नाशीनंतर योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले यावेळी नेमबाजी ही स्पर्धा घेण्यात आली .

   या स्पर्धेत जयदास पंडित आणि मालती म्हात्रे विजयी  झाले ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध चिरनेर आणि परिसरातील गावातील जनतेने जंगल सत्याग्रहाचा लढा दिला त्या  ठिकाणच्या अगदी नजीक हे गेट2 गेदर झाले. शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वानी चिरनेर आणि परिसरातील विकासासाठी आपण कटिबद्ध राहून एकदिलाने आणि जोमाने काम करण्याचे अभिवचन दिले.यानंतर सर्वानी चिकन सूप, लॉलीपॉप, खिमा, मटण  भाकरी अशा मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.पन्नाशीच्या उंबरठ्यावर असणारे आणि पन्नाशी पार केलेले आजी आजोबा देखील या ग्रुपमध्ये आहेत.या ग्रुपमधील अनेकजण आज उच्चपदस्थ आहेत. माजी न्यायाधीश चंद्रहास म्हात्रे, पत्रकार मिलिंद खारपाटील, पत्रकार सूर्यकांत म्हात्रे, चिरनेरचे माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, महिला पोलीस हवालदार प्रदेवी म्हात्रे, गायक जयदास पंडित , चिरनेर सेवा केंद्रप्रमुख सुरेश केणी, नाट्यकलाकार जगदीश घरत यासह अनेकजण राजकीय, शासकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

   या सर्वाना व्हाटस अँप च्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम या ग्रुपचे अडमीन मिलिंद खारपाटील यांनी केले.यावेळी वार्षिक सहल, पोपटी यावर चर्चा झाली.या गेट 2गेदर ला मिलिंद खारपाटील,चंद्रहास म्हात्रे, पद्माकर फोफेरकर, उपकार ठाकूर, राजेंद्र मुंबईकर, प्रकाश नारंगीकर,सुरेश केणी, जयदास पंडित, पंढरीनाथ नारंगीकर, सुभाष पाटील, सूर्यकांत म्हात्रे, गजानन फोफेरकर, विलास हातनोलकर, प्रमोद चिरनेरकर, चंद्रकांत गोंधळी, प्रकाश फोफेरकर, रोहिदास ठाकूर, जगदीश घरत,संजय मोकल, विजय मुंबईकर,  राजेंद्र म्हात्रे, प्रभाकर ठाकूर, जयवन्त नाईक,दिपक म्हात्रे, चंद्रप्रभा नारंगीकर,मालती म्हात्रे, प्रदेवी म्हात्रे आशा फोफेरकर असे 28 जण उपस्थित होते .सर्वांच्या सहकार्याने गेट2गेदर यशस्वी झाले.

अवश्य वाचा