अलिबाग

   शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि शेकाप नेते पंडीतशेठ पाटील यांच्या प्रयत्नांतून अलिबाग तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला विशेष मंजुरी मिळाल्यानंतर सदर काम सुरु झाले आहे. मात्र हे काम संथगतीने सुरु असल्यामुळे त्या कामात गती यावी या मागणीसाठी सोमवारी शेकाप महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली होती.

   चित्रलेखा पाटील आणि शेकापच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संथगतीने सुरु असलेल्या कामाची नागरिकांच्या वतीने तक्रार केली होती , निवेदणाची तात्काळ दखल घेऊन आज मंगळवारी बेलकडे पासून खड्यांवर कार्पेट मारण्यास सुरुवात करण्यात आली.

अवश्य वाचा