पनवेल, दि.19

   पनवेल येथील सुकापूर येथे राहणारे तसेच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर समर्थक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी त्यांचा वाढदिवस मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील नेरेपाडा येथील स्नेहकुंज आधारवड या वृद्धाश्रमात साजरा केला. यावेळी या वृद्धाश्रमाचे संस्थापक नितीन जोशी यांच्यासह वृद्धाश्रमातील 26 वृद्ध उपस्थित होते.

   यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, जेष्ठ सल्लागार सय्यद अकबर, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, सदस्य मयूर तांबडे, साहिल रेळेकर, गणपत वारगडा, आय आय एफ एल फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जावेद मुलाणी, लोककल्याणकारी संस्थेचे नासिर खान, नॅशनल टीव्हीचे पत्रकार ईलियाज शेख, शादाब शेख आदींसह फिरोज सय्यद यांचा परिवार उपस्थित होता. यावेळी उपस्थित वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना पत्रकार सय्यद अकबर यांनी बोलताना सांगितले की, फिरोज सय्यद हे प्रतिवर्षी अशाच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करून जे वृद्ध आपल्या मुलांपासून दुरावले आहेत त्या वृद्धांना मुलाचा सहवास देण्याचे काम फिरोज सय्यद यांनी केले आहे. यावेळी त्यांनी स्वतः त्यांच्यासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू त्यांना देऊन खरेतर समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांच्या कार्याने प्रेरित होऊन ते काम करीत असून अशीच समाजसेवा त्यांच्या हातून घडण्यासाठी त्यांना यावेळी सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

अवश्य वाचा