भाकरवड

   कर्जत तालुक्यातील शासकीय आश्रय शाळा पिगळस येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण विभागा अंतर्गत प्रकल्प स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेया स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण सहाय्यक प्रकल्प अधिकारी के बी खेडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

   दि 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत क्रिडा स्पर्धेतकबड्डी,खोखो,हॉलीबॉल,हॅन्डबोल,धावणे,थालिफेक,गोलाफेक,उंचउडी लांब उडी,इत्यादी खेळ घेण्यात आले या स्पर्धेत एकूण चोवीस आश्रम शाळेने सहभाग घेतला होता तर 1260 खेळाडू व200 हुन अधिक शिक्षक सहभागी झाले होते स्पर्धेत वरप येथील पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अनु,माध्यमिक आश्रमशालेतील जवळजवळ 60 विद्यार्थी नी सहभाग नोंदवला होता त्या मद्ये 14,व 17 वयोगटातील भारती गडखलउंच उडी,रेश्मा पारधी 1500 मीटर धावणे, गीता गडखल 100 मी व 400 मी धावणे,खुमा ठाकरे 600 मीटर, जयराम लेंडी 100मी,अमित निरगुडे 400मी धावणे,नयन वारगुडा लांब उडी ऊंच उडी या सर्व विद्यार्थी ने प्रथम क्रमांक पटकावला तर धर्मी पारधी थाली फेक,वनिता पाचागा लांब उडी,भारती गडखल400 मी ,प्रमिला हंबीर 200 मी,अमित निरगुडे लांब उडी,व अनंता दोरे 200मी धावणे या सर्व विद्यार्थ्यांनी  द्वितीय क्रमांक पटकावला.

   सदर स्पर्धेत सांघिक 4 विजेतेपद 1 उप विजेतेपद तर वयक्तिक 9 प्रथम,6 द्वितीय,5 तृतीय,क्रमांक प्राप्त करून सम्पूर्ण क्रिडा स्पर्धेत आश्रय शाळेला द्वितीय क्रमांक म्हणजेच उप विजेतेपद मिळाले आहे या घवघवीत यशाचे श्रेय शाळेच्या कार्यकारी विश्वस्त सुप्रिया सुळे यांनी मुख्याध्यापक हेमंत नाईक,प्राथमिक मुख्याध्यापक कुंदा नाईक,व्यवस्थापक संजय नाईक,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  यांना दिले तर मार्गदर्शक म्हणून शिवा चव्हाण, सुधीर पाटील,कीर्ती भोईर, सतिष जुईकर, यांचे विशेष अभिनंदन केले असुन परिसरातील ग्रामस्थ यांच्या कडून आश्रम शाळेचे कॊतुक होताना दिसत आहे

अवश्य वाचा