कर्जत-दि.18
मागील आठवड्यातील घरफोडीची घटना ताजी असतांनाच काल रविवारी दि.17 नोव्हेंबर रोजी पुन्हा कर्जत शहरातील मुद्रे परिसरात विशाल श्याम कांबळे यांच्या घरी घरफोडी होऊन तब्बल 4 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे.
मुद्रे येथील शिवानी रेसिडेन्सी ब्लॉक नं. 204 मध्ये दुसऱ्या मजल्यावर श्याम कांबळे राहतात. रविवारी ते काही कामानिमित्त घरा बाहेर गेले होते त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी भर दिवसा त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाट फोडून चोरी केली .
1 लाख 58 हजाराची सोन्याचे गंठण,1 लाख 34 हजाराचा नेकलेस, 33 हजाराची सोन्याची अंगठी, 21 हजाराची हिऱ्याची अंगठी, पाच हजार रोख रक्कम आदी दागिने मिळून एकूण 4 लाख 60 हजाराचा ऐवज चोरून नेला. चोरी झाल्याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक अरुण भोर अधिक तपास करीत आहेत.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेविषयी नाराजी व्यक्त होत असून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group