रत्नागिरी 

          रत्नागिरी आगारची शहर वाहतुकी मधील रत्नागिरी हातखंबा शहर बस ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन मार्गे जात असल्यामुळे प्रवाशांना या बस ने प्रवास करण्यात त्रास होत आहे सदर बस वर असणारे वाहक हे कामगार व विद्यार्थी पास या ला बस चालत नाही असे बोलतात या मुळे ही बस हातखंबा गावातून रिकामी परत जाते. त्यामुळे हातखंबा, पानवळ, चांदसुर्या, खेडशी, महालक्ष्मी मंदिर, कारवांचीवाडी ते गयाळवाडी पर्यंत चा स्टॉप चा पास या बस ला वाहक स्वीकारत नाही.

                तसेच आपण हातखंबा गावासाठी रत्नागिरी - हातखंबा - तारवेवाडी ही ग्रामीण बस सेवा ही सुरू केली. परंतु ही बस योग्य त्या वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना या बस ने देखील प्रवास होत नाही. त्यामुळे आता आपण रत्नागिरी हातखंबा शहर बस हे रेल्वे स्टेशन मार्गे न पाठवता आपण  हातखंबा तारवेवाडी आहे त्याच शहर बस तिकट दरात द्यावी ज्यामुळे प्रवाश्यांना या बस येण्या व जाण्यास योग्य राहील व दोन बस ऐवजी एकच बस चालू राहिली तर आपल्या आगाराचे इंधन बचत  होईल.

                तसेच या बस ची रत्नागिरी शहर बस स्थानाका तून सुटण्याची वेळ ही सकाळी ६.००, ७.१५, ९.००, ११.३०, दुपारी १.३०, ३.१०, ४.३०.(विद्यार्थी विशेष बस) व सायंकाळी ५.५० अश्या असाव्यात या वेळेत हातखंबा हून रत्नागिरी कडे येणार व जाणारे प्रवाशी आहेत.

               जरी आपल्या आगारामधून एवढ्या फेऱ्या शक्य नसल्यास आपण सकाळी ६.०० ,९.००, व सायंकाळी ४.३०(विद्यार्थी विशेष) आणि ५.५० अश्या फेरी सोडल्या तरी काहीच हरकत नाही. परंतु ही शहर बस आपण लवकरात लवकर नव्याने सुरू करावी असे निवेदन कोकण एस.टी.प्रेमी च्या सदस्यांनी रत्नागिरी आगार मधे केली.

अवश्य वाचा