कृषी विभाग दिग्रस आणि तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी, जामनेर यांच्या संयुक्तवतीने आयोजित, तसेच PMFAI - पेस्टीसाईडस मॅन्युफॅकचरींग अॅन्ड फॉर्म्युलेटर असोशिएशन ऑफ इंडीया द्वारे प्रायोजित अन्नदाता सुरक्षा आणि स्वास्थ्य उपक्रमातंर्गत (AASHI) दिग्रस येथे शेतकरी/शेतमजुर यांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शनपर कार्यक्रम दि. ८/१२/२०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात शेतकर्‍यांना शेतात फवारणी करते वेळी वापरण्यासाठीचा सुरक्षा संच मोफत देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिग्रस येथील प्रगतीशील शेतकरी श्री. प्रशांत राऊत यांनी केले संचालन श्री. चंदन कलोसे मंडळ कृषी अधिकारी दिग्रस यांनी केले. श्री. अर्जुन जाधव, तालुका कृषी अधिकारी दिग्रस यांनी ह्याप्रसंगी शेतकर्‍यांना पिकव्यवस्थापन आणि विविध शासकीय योजनांविषयची माहीती दिली तसेच मार्गदर्शन केले.

काही कारणास्तव PMFAI चे पदाधिकारी श्री. प्रदीप दवे व सौ. अपर्णा देशपांडे कार्यक्रमास उपस्थित राहु शकले नाही. आशी सदस्य श्री यतीन मोकल ह्यांनी शेतकर्‍यांना शेतीविषयक जोडधंदे आणि तंत्रज्ञान ह्याबद्दल माहीती दिली. तसेच फवारणी वेळीस स्वत:च्या सुरक्षेबद्दल घ्यावयाची काळजी आणि फवारणीची योग्य पद्धत याबद्धल मोलाचे मार्गदर्शन केले. ह्यावेळीस उपस्थित तुळसाई बहुउद्देशीय संस्था अर्जुनवाडी, जामनेर चे उपाध्यक्ष व आशी सदस्य श्री. राहुल सोनवणे यांनी संस्थेबद्दल व संस्थेच्या लोकोपयोगी उपक्रमांबद्दल उपस्थितींना माहीती दिली. आशी सदस्य कु. भक्ती पठारे ह्यांनी शेतकर्‍यांना सुरक्षेविषयी आणि या उपक्रमाच्या उद्दीष्टाबद्दल मोलाची माहीती दिली. प्रसंगी आशीचे सदस्य श्री. मनोज मोरे, श्री. प्रशांत अहीरे, श्री विकास शारदा, श्री. रविंद्र पाटील तसेच सौ. प्रिती सोनवणे उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाला ७०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकर्‍यांनी सुरक्षा संच वापरण्याची खात्री देऊन कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अत्यंत यशस्वी अशा ह्या कार्यक्रमात कृषि विभाग दिग्रस आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रगतीशील शेतकरी श्री. प्रशांत राऊत ह्यांचा मोलाचा सहभाग आणि सहकार्य लाभले.

दिग्रस विभागात अजुन असे बरेच कार्यक्रम घेण्याचा मानस आशी संस्थेने व्यक्त केला. आणि त्यासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन कृषी विभागाने दिले आहे.

 

अवश्य वाचा