बेळगाव,दि.१८

                       प्यास फाऊंडेशनने गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे.अनेक दुष्काळग्रस्त भागात प्यासने नवी तळी निर्माण करून,जुनी तळी पुनरुज्जीवित करून तेथील जनतेला पाणी उपलब्ध करून दिले आहे.आपल्या भागातील जलसाठे सुरक्षित ठेवा.पाण्याचे योग्य व्यवस्थापन करा.तुमच्या भागातील तळी, विहिरी स्वच्छ ठेवा म्हणजे पाणी नेहमी स्वच्छ राहील असे उदगार के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी काढले.

                             प्यास फाउंडेशनतर्फे पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या भावीहाळ येथील तळ्याचे ग्राम पंचायतीकडे हस्तांतरण के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांच्या हस्ते अल्लामप्रभु स्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात हस्तांतरण करण्यात आले.याप्रसंगी डॉ. प्रभाकर कोरे बोलत होते.व्यासपीठावर प्यासचे अध्यक्ष डॉ.माधव प्रभू,ग्राम पंचायत अध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते.

                           अल्लामप्रभु स्वामीजींनी आपल्या भाषणात प्यास फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही प्यासने आपले कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगितले.डॉ माधव प्रभू यांनी प्यास फाऊंडेशनने पुनरुज्जीवित केलेल्या तळ्याची माहिती दिली.डॉ प्रीती कोरे आणि अभिमन्यू डागा यांचा ग्राम पंचयातीतर्फे सत्कार करण्यात आला.पाच एकर जागेतील तळ्यामुळे सोळा हजार जनतेची आणि दोन हजार जनावरांची पाण्याची सोय झाली आहे.आपले वडील डॉ राजेंद्र प्रकाश यांच्या स्मरणार्थ विवेक प्रकाश यांनी या तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी   आर्थिक सहायय केले आहे.यावेळी प्यास फाउंडेशनचे अवधूत सामंत,विजय भागवत,विनय बागी ,सतीश लाड,माधुरी गुलबानी,दीप्ती इंगळे, ज्योतिबा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अवश्य वाचा