पाताळगंगा १८ नोव्हेंबर, 

           गुरूनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू असुन गुरुनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुद्वारात सध्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पार पडले असून यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र थोरवे यांनी शनिवारी दुपारी खोपोलीतील गुरुद्वारात भेट देऊन दर्शन घेतले. तर दुपारनंतर शीख बांधवानी खोपोली शहरात भव्य मिरवणूक काढीत धार्मिक कार्य समजून संपूर्ण शहर पाणी मारीत  झाडूने सफाई करीत आपल्या उत्सवाची परंपरा जपली. याप्रसंगी शहरात ठिकठिकाणी प्रात्यक्षिक सादर करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याने या सोहळ्यात वेगळीच रंगत चढल्याने शीख बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

                   सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली. गुरूनानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिल्याने गुरुनानक यांच्या अनेक आख्यायिका गायल्या जात असून खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात शीख बांधवांची वस्ती असून आपल्या समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम वर्षभर पार पडत असतात. शास्त्रीनगर भागात भव्य गुरुव्दारा मंदिर आहे. 

                  प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण समाज एकत्र होत असतो. शनिवारी गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने सकाळ पासून विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले तर सायंकाळी खोपोली शहराच्या मुख्य बाजारपेठेसह अन्य ठिकाणी भव्य रॅली काढून समाजच्या रीतीरिवाजा प्रमाणे पाणी व झाडू मारून शीख बांधवांचे शस्त्र हातात घेऊन ठिकठिकाणी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट देऊन गुरुव्दारामध्ये जाऊन दर्शन घेतल्याने यावेळी गुरुद्वारा तर्फे शालदेऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक सुनील पाटील, शिवसहकार सेनेचे शहरप्रमुख हरीश काळे, उपनराध्यक्षा विनिता औटी,  नगरसेवक प्रशांत कोठावले, माजी नगरसेवक दिलीप पुरी, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, सरदार कुलवंतसिंह, अध्यक्ष हार्दीप सिंग, चारणजीत सिंग, रिंकू कोहली, गिनी कोहली, मलकीत सिंग, गिनीभाई, युवासेना अधिकारी संतोष मालकर याच्यासह शेकडो शीख बांधव उपस्थित होते.

अवश्य वाचा