नेरळ,ता.18

             केंद्र शासनाने मुलांसाठी सुरु केलेल्या चाईल्ड लाईनसे दोस्ती या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्ह्यात महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली विविध ठिकाणी जागृती शिबिरे घेतली जात आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्ष रायगड द्वारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा याठिकाणी बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करून मुलांना बाल हक्क व त्यांची सुरक्षितता यावर प्रबोधन करण्यात येत आहे. 

             बालदिना निमित्त 14 ते 10नोव्हेंबर बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन बाल संरक्षण कक्षाकडून करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरवात 14 नोव्हेंबर रोजी अलिबाग एसटी स्थानक येथूनं करण्यात आली. यावेळी बस स्थानकात नगरपरिषद शाळेतील बालकांसोबत संवाद साधत या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.आज 18 नोव्हेंबर रोजी कर्जत तालुक्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नेरळ विद्या मंदिर येथून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राम म्हस्के यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायद्याने संरक्षण व बाल न्याय संरक्षण या कायद्याच्या बाजू समजावून देत 2012 साली आलेल्या बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात असणाऱ्या तरतुदी. मुलांचे हक्क त्यांना जीवन जगण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार या पासून कोणत्या मुलाला आपल्या आजूबाजूस किंवा असे एखादे मूळ आपल्या दृष्टीस पडल्यास आपले आई वडील, शिक्षक याना त्याबद्दल सांगावे. जेणेकरून आपण त्यास मदत करू शकू असा खुला संवाद म्हस्के यांनी विद्यार्थ्यांशी साधला. 

           याच पद्धतीने माणगाववाडी आश्रमशाळा, महिला मंडळ शाळा कर्जत येथे देखील विद्याथ्यांशी संवाद साधण्यात आला. तर कर्जत रेल्वे स्थानकावर आयोजित कर्जत चाईल्डलाईनसे दोस्ती या कार्यक्रमात चाईल्डलाईनवर असलेल्या ममता आधार द्या सुखी राहील मूल या कवितेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. दिशा केंद्राचे अशोक जंगले यांनी 1098 या चाईल्ड लाईन हेल्पलाईन क्रमांकाची सर्वाना माहिती दिली. लहान मुलांवरती अन्याय होत असेल तर त्यासाठी 1098 हा राष्ट्रीय सहाय्यता क्रमांक आहे.  त्यावरती आपण फोन करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. आपला कॉल तिथे रेकॉर्ड असतो. आणि आपल्या कॉल अन्व्ये जिथे मदतीची गरज असते तिथे तात्काळ मदत उपलब्द करून दिली जाते अशी माहिती जंगले यांनी दिली. तसेच याप्रसंगी सह्यांची मोहीम राबवली गेली. उपस्थित मान्यवरांसह स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने चाईल्ड लाईनची माहिती घेऊन सह्यांच्या मोहिमेस प्रतिसाद दिला. सुधागड पाली येथे या सप्ताह कार्यक्रमाचा समारोप होईल अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राम म्हस्के यांनी दिली आहे.   

               यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राम म्हस्के, रेल्वेचे झोनल मेम्बर केतन शाह, रेल्वे सुरक्षा बलचे विश्वनाथ सिंग, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे, कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जोगदंड,  दिशा केंद्राचे प्रदीप गायकवाड, अशोक जंगले,माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड, संदीप गवारे, अविनाश बदे, दशरथ चौधरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे स्वप्नील मसने, नेरळ विद्या मंदिरचे प्राचार्य पी.विचवे, उपप्राचार्य आर.बागुल यांसह विद्यार्थी, प्रवासी व शिक्षक आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. 

अवश्य वाचा