मुंबई 

 

सध्या दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत असून तरुणांच्या अंगी कलाकौशल्य गुणवत्ता असूनही काहीवेळा नोकरी मिळत नाही अशा तरुण वर्गाला नोकरीची संधीही त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणांना मदतीचा हात म्हणून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत भालचंद्र हरी भोईर फाउंडेशन जूचंद्र आयोजित रोजगार मेळावा रश्मी पिंक सिटी ऑफिस ग्राउंड नायगांव पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रोजगार महोत्सवाचे उदघाटन श्रीमती भानुबाई भालचंद्र भोईर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व स्व.भालचंद्र भोईर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने आमदार क्षितीज ठाकूर,आमदार राजेश पाटील, सभापती कन्हैया भोईर, महापौर प्रविण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर,सभापती उमा पाटील, रूपेश जाधव,भालचंद्र हरी भोईर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शेखर भोईर आदीं नायगांव विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित रोजगार मेळावा कार्यक्रम संपन्न करण्यात आले. रोजगार मेळाव्यात १२३ युवक व युवतींना नियुक्ती पत्रक देऊन नोकरीची संधी मिळाली.निवड झालेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन शुभेच्छा देण्यात आले,प्रथमच वसई तालुक्यातील नायगांव पूर्व विभागात भव्य दिव्य रोजगार मेळाव्यात येणाऱ्या युवक - युवतींना चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी विशेष मार्गदर्शन प्रमुख मान्यवरांनी करण्यात आले.यावेळी ८३५ युवक- युवतींनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या. महोत्सवप्रसंगी २४ नामांकित मोठया कंपनीचे प्रमुख अधिकारी प्रतिनिधी बेरोजगार युवक -युवतींच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते.याप्रसंगी १२३ युवक -युवतींची मुलाखतीनंतर निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच २२५ युवक -युवतींना कंपनी कार्यालयामध्ये येऊन पुन्हा मुलाखती देण्याचे निमंत्रण कंपनीच्या प्रमुख प्रतिनिधींनी सांगितले.

रोजगार मेळावा पार पाडण्यासाठी डी.एम.एस. ग्रुप,ओम शिव साई प्रतिष्ठाण, नायगांव एकता संस्थान,भालचंद्र हरी भोईर फाउंडेशन तसेच सदस्यांनी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.या दरम्यान अनेक युवती युवक शिक्षणानंतर बेरोजगार असल्याचे वसई तसेच मुंबई ठाणे पालघरमध्ये दिसून आल्याने यांच्यासाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, सभापती कन्हैया भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार मेळावा घेतला.मेळाव्यामुळे २५० बेरोजगारांना रोजगार मिळाला, ज्यांना नोकरी मिळाली नसेल त्यांनी सुद्धा अजिबात निराश न होता पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज राहावे, ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी जिद्द, चिकाटीने आत्मविश्वासाने नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिध्द करावे यशाचे शिखर गाठावे हीच प्रामाणिक अपेक्षा भालचंद्र हरी भोईर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शेखर भोईर यांनी व्यक्त केली.

अवश्य वाचा