नेरळ,ता.18

             रायगड जिल्ह्यातील महाड येथे कामावर असलेल्या तलाठी यांना मारहाण प्रकरणी महाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याचे मागणीसाठी आज 18 नोव्हेंबर रोजी महसूल विभागने कामबंद आंदोलन उभे केले. आज दिवसभर कर्जत तहसिल कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून ही मागणी रायगड तलाठी संघाच्या वतीने करण्यात आली.

                महाड येथील कोंझर तलाठी सजाचे तलाठी सुग्राम सोनवणे यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्या कोणताही संबंध नसताना गुन्हा दाखल करून अटक केली. याबाबत संबंधित पोलीस अधिकारी सणस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे मागणीसाठी आज रायगड तलाठी संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.सकाळ पासून महसूल विभागाचे सर्व 30 तलाठी,चार मंडळ अधिकारी आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांनी या कामबंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.तलाठी संघाचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष बापू सरगर,उपाध्यक्ष रमेश भालेराव,सचिव दीप्ती चोणकर यांनी सायंकाळी आपल्या मागणीचे निवेदन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देऊन एक दिवसाचे कामबंद आंदोलन स्थगीत केले.

                मात्र महसूल विभागातील कार्यालयीन कर्मचारी आणि तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या कामबंद आंदोलनामुळे महसूल विभागातील सर्व कामे ठप्प झाली होती.तहसिल कार्यालयात निवडणूक वगळता कोणतीही कामे आज दिवसभरात झाली नाहीत.तलाठी संघाने पुकारलेल्या या एकदिवसीय कामबंद आंदोलनात महसूल कर्मचारी यांनी 100 टक्के सहभाग नोंदविला अशी माहिती कर्जत तालुका अध्यक्ष बापू सरगर यांनी दिली आहे.

अवश्य वाचा