आगरदांडा 

मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक शिघ्रे नदीत  श्री गणेश , देवी विसर्जन करण्यात येते.परंतु सध्या याच  नदीत परिसरातील काही नागरिक घाण - कचरा , कोंबडी कापलेली पिसे या ठिकाणी टाकुन या नदीला डंम्पिंग ग्राउंड  बनवले पाहावयास मिळत  आहे.या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या घाणीमुळे दुर्गधी पसरली असुन या पुलावरून जाताना लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.    . या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, नदीपात्राच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग तयार होत आहे.

ऐतिहासिक शिघ्रे नदी  प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. घाण - कचरा , कोंबडी कापलेली पिसे  नदीत सोडले जात असल्यामुळे प्रदुषित पाणी होत आहे .नदीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  नदीचे संरक्षण व संवर्धन करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

प्रदुषणमुक्त करून पवित्र  शिघ्रे  नदीला गतवैभव प्राप्त व्हावे, पर्यावरणीय दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. नदीच्या पात्रात आज मातीचे ढिगारे, गाळाचे डबके, झाडेझुडपे दिसत आहेत. निसर्गतः वाहणाऱ्या या  शिघ्रे नदी नदीला  दुर्गधी फटका बसला आहे.  नदीचे आजचे स्वरूप डबक्यासारखे झाले आहे. यात भर म्हणजे पवित्र असलेल्या  शिघ्रे नदीत  घाण, कचरा, कपडे टाकण्यात येत आहेत.

नदीच्या पात्रात. नदीपात्राची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. प्रचंड दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचा खच, उदास भकास पात्र तेवढे शिल्लक दिसत आहे. 

शिघ्रे नदीची पवित्रता राखण्यासाठी प्रशासनाने नदीत सोडण्यात येणारे घाण -कचरा , कोंबडी कापलेली  पिसे टाकण्यावर कडक कारवाई करून या ऐतिहासिक नदीला वाचावावे.

या संदर्भात शिघ्रे ग्रामपंचायत सरपंच - संतोष पाटील यांना विचारणा करण्याकरिता भ्रमणध्वनी केली  असता त्याचा संपर्क होवु शकला नाही.

ऐतिहासिक शिघ्रे नदी  घाण- कचरा टाकल्याने त्या नदीचे पाणी काळेकुटे झालेले दिसत आहे.

अवश्य वाचा