उरण 

उरण मध्ये सध्या अनेक समस्याचा सामना उरण कराना करावा लागत आहे .या समस्या सोडविण्यत सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत असतानाच उरण मधील युवा पिढी या समस्याना शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन वाचा फोडण्याचे कांम करत आहे याचाच एक भाग म्हणून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रेरित अजित म्हात्रे हे 1)दास्तान फाटा ते दिघोडे या एकेरी मार्गावरील आवजड वाहतुक कायमची बंद 2)गव्हाण फाटा ते दिघोडे व गव्हाण फाटा ते करळ या दोन मार्गावरील आवजड वाहनांची वाहतुक ठराविक वेळेत बंद 3)रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद 4)तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती आदी प्रमुख मागण्यां साठी आज पासुन दिघोडे येथे बस स्टॉप वर प्रांतीक आमरण उपोषणाला बसले आहेत.

 या वेळी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक/सल्लागार - अॅड.निग्रेश गजानन पाटील .जि.प.सदस्य वैजनाथ ठाकुर सामाजिक कार्यकर्ते वसंत मोहिते .शंकर कासुकर गोपाळ पाटील गुरुजी .परशुराम पाटील.रोटरी क्लब ऑफ सनराईज पनवेल अध्यक्ष रायगड भूषण राजू मुंबईकर .कॉ.जयवंत पाटील. स्वराज्य रिक्षा संघटना उपाध्यक्ष रमण कासकर.विलास पाटील  .मा.उपसरपंच प्रफुल्ल पाटील .प्रल्हाद कासकर अरुण पाटील मा.सरपंच चिरले हिराजी पाटील .राजेंद्र मढवी ..उरण सामाजिक संघट नेचे सुधाकर पाटील .महेश म्हात्रे (आवरे)अच्यूत कडु.आदी सह सर्व स्थानिक रिक्षा संघटना पदाधिकारी.सभासद .आगरी कोळी कराडी संघट ना पदाधिकारी सभासद व परिसरातील गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते .

 या वेळी राजू मुंबईकर यानी केअर ऑफ नेचर संस्था वेश्वी तर्फे उपोषणास जाहिर पाठिबा दिला तसेच बैलोन्डा खार प्रकल्प ग्रस्त संघट नेच्या वतीने रविंद्र कासुकर यानी अजित म्हात्रे यांच्या उपोषणास जाहिर पाठिंबा दिला.तसेच उरण सामाजिक संघटना उरण तर्फे सुधाकर पाटील यानी जाहिर पाठींबा दिला.

 

अवश्य वाचा