मुरुड जंजिरा    

      दि. १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत "बाल सुरक्षा सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. आपल्या देशात एकूण ५० कोटी बालकांची संख्या आहे. आजचे बालक हे उद्याचे नागरिक आहेत. देशाच्या पुढील जडण घडण व विकासामध्ये त्यांना सक्रिय व्हायचे आहे. या सर्व बालकांचे संगोपन चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने रायगड पोलीस दल, मुरुड पोलीस ठाणे  व अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड-जंजिरा महाविद्यालयातील महिला विकास कक्ष यांच्या सयुंक्त विद्यमाने तारुण्यात येणाऱ्या मुलं-मुलींसाठी आज दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी बालकांवरील लैंगिक अत्याचार व त्यापासून बालकांचे संरक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      सदर जनजागृती कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून रायगड पोलीस दल अलिबाग च्या उपविभागीय पोलीस अधिकारी . सोनाली कदम मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये मुरुड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक . आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक . प्रशांत शुभनावळ तसेच अंजुमन इस्लाम जंजिरा चे सचिव . हिफझूर रेहमान नझीरी, खजिनदार . अल्ताफ मलिक, महाविद्यलाय विकास समितीचे सदस्य . तौसिफ़ फत्ते, अंजुमन प्रायमरी स्कूल चे चेअरमन . हाफीजु कबले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी, अंजुमन हायस्कूल चे प्राचार्य  जाहिद गोठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

      . सोनाली कदम मॅडम यांनी उपस्थित सर्व बालकांना मार्गदर्शन करताना त्यांना सध्याच्या वातावरणात तारुण्यात येणाऱ्या बालकांनी सतर्क राहण्याचे आव्हाहन केले. स्वतः सक्षम बनून कोणत्याही अमिषाला बळी न पडता येणाऱ्या पेचप्रसंगावर मात करता येणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाईल च्या दुनियेत वावरत असताना सतर्क राहून योग्य प्रमाणात मोबाईल चा वापर करणे आवश्यक आहे. या मुलांवर त्यांच्या पालकवर्ग व शिक्षकांचे हि बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. जर कोठे बालकांवर अत्याचार होत असतील तर त्याची माहिती लगेचच जवळील पोलीस ठाणे मध्ये देण्यात यावी

      या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांनी उपस्थित कुमारवस्थ्येत येणाऱ्या विद्यार्थांनी सभोवतालील परिस्थितीत  सतर्क राहून  येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला विकास कक्ष  प्रमुख प्रा. श्रुती कारभारी यांनी विशेष प्रयत्न केले. 

अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात  बालकांवरील लैंगिक अत्याचार व त्यापासून बालकांचे संरक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अलिबाग मुरुड  च्या उपविभागीय पोलीस अधिकारी . सोनाली कदम दिसत आहेत.त्यांच्या समवेत मुरुड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक . आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक . प्रशांत शुभनावळ तसेच अंजुमन इस्लाम जंजिरा चे सचिव . हिफझूर रेहमान नझीरी, खजिनदार . अल्ताफ मलिक व प्राचार्य शरद फुलारी दिसत आहेत.  

 

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत