आंबेत

अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन डाऊ केमिकल्स व शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमाने "जिज्ञासा २०१९" या राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धचे आयोजन यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे करण्यात आले आहे.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन ने नेहमीच विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती त्यांच्यामधील असणारी सृजनशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे "जिज्ञासा"२०१९ या राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन या स्पर्धेचे यंदाचं मुख्य ठिकाण ठरलं आहे कोकणातील चिपळूण.या मध्य ठिकाणी ही सदर स्पर्धा  ०४ व ०५ डिसेंबर २०१९ रोजी बांदल हायस्कुल चिपळून याठिकाणी होणार आहे.

सदर कार्यक्रम डाऊ केमिकलच्या उत्तरदायित्व प्रकल्पाच्या  सहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने संपन्न होणार असल्याची माहिती अगस्त्याचे महाराष्ट्र रिजनल हेड अमोल नामजोशी यांनी वार्तालाप करताना सांगितलं.

अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रात्यक्षिकासह साधनयुक्त विज्ञान शिक्षण देऊन विज्ञानाप्रती मुलांचा विज्ञानामधील उत्साह  वाढविणे,मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जोपासणे या उद्देशाने देशातील  २२ राज्यात कार्य करत आहे."जिज्ञासाचा मंच मुलांना व शिक्षकांना  त्यांचे विज्ञानावर आधारित मॉडेल  व्यापक प्रेक्षक वर्गापुढे मांडून त्याबाबत माहिती देण्याचीसंधी देतो.त्यामुळे त्यांच्यातील सृजनशीलता,आत्मविश्वास, नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते.

सदर स्पधेसाठी शासकीय तसेच निमशासकीय ,अनुदानित, विनाअनुदानित  शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होऊ शकतील. विद्यार्थ्यांसाठी १.प्राथमिक विभाग  ( ५वी ते ७वी) २. माध्यमिक विभाग (८वी ते १० वी) तसेच शिक्षकांसाठी  शिक्षक विभाग असे तीन विभाग करण्यात आले आहेत. एका प्रतिमानासाठी (मॉडेल)दोन विद्यार्थी  व एक शिक्षक यांना सहभागी होता येईल. सदर स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य असून सदर स्पर्धेची नोंदणी २२नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. निवड झालेल्या स्पर्धकांची यादी  २५ नोव्हेंबर पर्यंत जाहिर करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रवास खर्च तसेच निवास भोजनाची व्यवस्था अगस्त्या मार्फत करण्यात येईल.

सदर स्पधेचा अर्ज व अर्ज करण्याची पद्धत समजून  घेण्यासाठी संस्थेच्या पुढील प्रतिनिधींना  संपर्क करून विचारू शकता.

 संपर्क  सार्थक  सपकाळ- ७३५०७४०६७५, रवींद्र कुलकर्णी- ९५६१८१९९६९, नेहा लाड- ९४२०१४३९८६

अवश्य वाचा