कशेळे 

          आदिवासी विकास पेण प्रकल्प यांच्या क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक आश्रमशाळा पिंगळस येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये संपूर्ण पेण प्रकल्प मधील अनुदानित आणि शासकीय एकूण २४ शाळांमधील १२६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.दरवर्षी सर्व खेळांमध्ये प्रथम असलेल्या शाळेला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात येत असते.यावर्षी चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी रोहा तालुक्यातील शासकीय माध्यमिक शाळा सानेगाव ही ठरली.

               एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या दरवर्षी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.यावर्षी या स्पर्धा कर्जत तालुक्यातील शासकीय उच्चमाध्यमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस येथे आयोजित करण्यात आल्या.या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये पेण प्रकल्पच्या अंतर्गत असलेल्या अनुदानित आणि शासकीय अशा एकूण २४ शाळा सहभागी झाल्या असून १२६० विद्यार्थी यांनी स्पर्धेत सहभागी झाले होते.यामध्ये कब्बड्डी, खो-खो,उंचउडी,भालाफेक अशा खेळांचे प्रकार स्पर्धेत ठेवण्यात आले होते.दरवर्षी प्रकल्पस्तरीय स्पर्धेत खेळांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळेला चॅम्पियन ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातो.२०१९ यावर्षाच्या चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी रोहा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव ठरली आहे.यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी के बी खेडकर,सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण अजित पवार,पिंगळस आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संजय मागडे,तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण भिसे यांनी केले.

अवश्य वाचा