पेण 

पेण नगरपरिषदेच्या मैदानावर गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या स्वररंगच्या पेण फेस्टिवलचा रविवारी कुस्त्यांच्या स्पर्धांनी शानदार समारोप झाला. शेवटच्या दिवशी या फेस्टीवलमध्ये पेण तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने विविध गटांच्या कुस्ती स्पर्धा झाल्या. त्यामध्ये मुलींच्या गटांच्या कुस्ती स्पर्धाचा देखील समावेश होता. कुस्तीगीरांना प्रोत्साहन तसेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रथमच स्वररंगतर्फे पेण फेस्टिवलमध्ये या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. त्यास सर्वच स्तरातून उत्फुर्त प्रतिसाद लाभला.

 या कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी गटात दयानंद पाटील (पिंपळपाडा) प्रथम तर रोशन पाटील (पिंपळपाडा) द्वीतीय क्रमांकाचे विजेते ठरले तसेच प्रौढ गटात 79 किलो वजनी गटात प्रथम हरेश साळुंखे (गागोदे),द्वीतीय नितीन पडवळ (गागोदे),86 किलो वजनी गटात प्रथम महेंद्र पाटील (पिंपळपाडा), द्वीतीय युवराज दहीफोडे ( गागोदे), 92 किलो वजनी गटात प्रथम रोशन पाटील (आंबिवली), द्वीतीय दीपक पाटील (आंबिवली), 79 किलो वजनी गटात प्रथम चंद्रकांत भोईर (धोंडपाडा),द्वीतीय रोशन जगताप (गागोदे) हे स्पर्धक विजेते ठरले. त्याच प्रमाणे मुलींच्या गटातील 53 किलो वजनी गटात प्रथम प्रांजली कुंभार,द्वीतीय रोशनी परदेशी,63 किलो वजनी गटात प्रथम ऋतुजा खंडगे,द्वीतीय सोनिया सूर्यवंशी, 67 किलो गटात प्रथम स्नेहा पाटील,द्वीतीय दिव्या शिंदे,या विजेत्या ठरल्या. तसेच मुलींच्या दुसऱ्या गटामध्ये 50 किलो गटात अनुष्का घरत (पांडापूर) प्रथम तर रोशनी डाऊर(कळवे) द्वीतीय,53 किलो गटात दक्षता भोईर प्रथम,65 किलो गटात हर्षाली पाटील (खारपाले) प्रथम,72 किलो गटात दिव्या मोकल (खारपाले) प्रथम तर सुष्टी शिंदे द्वीतीय,76 किलो गटात साक्षी शिंदे (गागोदे) प्रथम तर नियती मोकल द्वीतीय या मुली विजेत्या ठरल्या मुलांच्या युवा गटात 57 किलो गटात रितेश चव्हाण,45 किलो गटात विराज म्हात्रे (उचेडे),70 किलो गटात संकेत ठाकूर (बेलवडे) हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले तसेच 17 वर्षांखालील गटात 35 किलो गटात सोहेल शेख,45 किलो गटात सुरज चाळके व 90 किलो गटात संदीप धानी हे विजेते ठरले. कुमार गटात ऋषीकेश पाटील (कामार्ली),पराग पाटील (पिंपळपाडा),वेदांत पाटील(खारपाले) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच युवा गटात मंदार पाटील (पिंपळगांव),तन्मय पाटील (बेलवडे) तसेच तेजस थळे (अंतोरे) या स्पर्धकांनी अनुक्रमे 60 ,72 व 87 किलो वजनी गटात बाजी मारली. त्याच प्रमाणे कुमार गटाच्या 17 वर्षांवरील स्पर्धेत संघर्ष भोईर,गौरव कदम,रोहन जगताप,मनीष पाटील,रितेश पाटील,आयुष पाटील आदि विविध वजनी गटात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. 

 विविध गटातील विजेत्यांना अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी,मार्गदर्शक ,कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिशचंद्र शिंदे,कार्याध्यक्ष ऍड.विकास म्हात्रे,खजिनदार लक्ष्मण पाटील,उपाध्यक्ष कीशोर म्हात्रे,सहखजिनदार मोहन पाटील,सहचीटणीस हिरामण भोईर,कमलाकर पाटील,सल्लागार प्रवीण पाटील,सुदाम पाटील,,गजानन भोईर,रामजी गोळे,अलिमिया बेमजी, गजानन पाटील,स्वररंगचे उपाध्यक्ष सुनिल पाटील,अनिकेत साळवी,भारत साठे,यश बांदिवडेकर,पंकज म्हात्रे,प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी,चेतन मोकल,अमोद मुंडे,अविनाश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कुस्ती स्पर्धाचे पंच-परीक्षक म्हणून लक्ष्मण पाटील,सदानंद पाटील,गजानन भोईर,जयेश भोईर,सुदाम पाटील,राजेंद्र कुंभार,विजय भगत यांनी काम पाहिले. 

अवश्य वाचा