१८ नोव्हेम्बर २०१९

        पुणे येथील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कणघर शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन करून जिल्ह्यासह तालुक्याचे आणि पर्यायाने कणघर शाळेचे नाव उज्वल झाले आहे.त्यामध्ये कणघर शाळेतील इयत्ता ३ री मधील  आदिवासी विद्यार्थ्या  सुहास मंगेश वाघमारे  याने या  राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. 

           कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त भागास व्यायाम देणारा क्रीडा प्रकार म्हणुन मल्लखांब ह्या पारंपरिक क्रीडा प्रकारची ओळख आहे. ह्या क्रीडा प्रकारची जपवणूक रा जि प शाळा,कणघर चे विद्यार्थी गेले कित्येक वर्षे करत आहे. सुहासच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तरी देखील त्याने शाळेतील शिक्षकांच्या मदतीने अतुल्य स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन हे यश मिळवले. शाळेतील मल्लखांब प्रशिक्षणासाठीच्या अपुऱ्या साधन सामुग्री मध्ये देखील सुहासने मिळवलेले यश कौतुकास पात्र असल्याचे मत मुख्याध्यापक अवधूत पवार  यांनी व्यक्त केले.

         सुहासला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यासाठी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सरपंच  श्रीपत धोकटे, माजी पं.स. सभापती सौ. उज्वलाताई सावंत, उपसरपंच धनंजय सावंत, शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष  यशवंत सुर्वे, उपाध्यक्षा  सौ. श्वेता इप्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यस्थापन समिती सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष  रविंद्र सावंत, समाजसेवक  संतोष (नाना) सावंत,  रमेश सावंत,  रामकृष्ण सावंत,  कृष्णा मोरे ,  सुरेश पातेरे,  अनिश शिगवण,  सुनिल भोसले,  किसन जंगम, सौ. शुभांगी गुजर, सौ. प्रगती धोकटे,  नरेश भुवड, सुरेश वाघरे,  शंकर वाघरे (पो.पाटील ) यांची विशेष मदत झाली.         

      या यशाबद्दल गट विकास अधिकारी वाय.एम. प्रभे साहेब, गट शिक्षणाधिकारी संतोष शेडगे साहेब, केंद्र प्रमुख  अनिल ठाकूर , मुख्याध्यापक  अवधूत पवार ,  सूरज भऊड,  पवन नारायण आडवळे  (राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक.)यांनी सुहास वाघमारे याचे अभिनंदन करून त्यास सुयश चिंतिले.

अवश्य वाचा