पोलादपुर -

   शनिवारी दुपारी पोलादपूर नजीक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या कंटेनरला पोलादपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ऍक्टिवा स्कूटरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातातील पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील दोघे भाऊ जखमी झाले. त्यापैकी स्कूटरस्वाराचा महाड येथे मृत्यू झाल्याने खडपी गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नवीन खरेदी केलेल्या ऍक्टिवा स्कूटरस्वार अमित रघुनाथ शिंदे(वय 30) आणि गणेश रघुनाथ शिंदे (वय 25) हे दोघे भाऊ महाडच्या दिशेने पोलादपूरकडे येताना रस्त्याबाहेर साईडपट्टीवर उभा असलेल्या कंटेनरला जोरदार धडक देऊन हे दोघे भाऊ जखमी झाले. सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी ऍक्टिवा स्कूटरचालक अमित याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर पुढील उपचार करण्यासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

   मात्र, महाडपूर्वीच अमित याची प्रकृती ढासळल्याने त्याच्यावर महाडमध्ये उपचार करण्यासाठी थांबविले असता ट्रॉमाकेअर सेंटर आणि खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स उपलब्ध झाले नाहीत. परिणामी, उपचाराविनाच गंभीर जखमी अवस्थेतील स्कूटरस्वार अमित याने प्राण सोडल्याची माहिती सोबतच्या व्यक्तींनी दिली.यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये अमित रघुनाथ शिंदे याचा मृतदेह आणण्यात आला. त्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करून रविवारी पहाटे त्याच्या नातेवाईक व खडपी ग्रामस्थांच्या हाती सोपविण्यात आला. यानंतर खडपी गावामध्ये अमित याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.