अलिबाग

   रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गरूडपाडा येथील श्री सिध्दीविनायक क्रीडा मंडळ यांच्यावतीन गरूडपाडा येथे जिल्हा स्तरिय कबड्डी स्पर्धा भरविण्यात आल्या. या स्पर्धेत पेझारी येथील म्हसोबा संघाने अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांकाचे रोख 21 हजार रुपये व चषक बक्षीस मिळविले. उपसरपंच प्रवीण कदम व दिलीप तेलंगे यांच्या हस्ते विजयी संघाला बक्षीस देण्यात आले. कावीरचे उपसरपंच प्रवीण कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी सायंकाळी या स्पर्धेला सुरुवात झाली.  स्पर्धेचा उद्घाटन समारंभ  काविरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे, उपसरंच प्रविण कदम, शांताराम कदम, सुधाकर पाटील, गजानन पाटील, शांताराम पाटील, रामचंद्र तेलंगे आदी मान्यवरांच्या उपस्थित झाला.

   यावेळी  सुरेश म्हात्रे, रचना भगत, प्राप्ती पाटील, मोहीनी भगत, मोहीनी मानकर, महेश म्हात्रे, सतिश भगत, अजित ठाकूर, दिलीप वरसोलकर, मधुकर ठाकूर, ग्रामस्थ उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबाग नगरपालिकेच्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रविण कदम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत रायगड जिल्हयातील एकूण 48 नामवंत व आमंत्रित संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेत पेझारी येथील म्हसोबा संघ विजयी ठरला. या संघाला प्रथम क्रमांकाचे रोख 21 हजार रुपये व चषक, चरी येथील श्री हनुमान संघाला द्वीतीय क्रमांकाचे रोख 15 हजार रुपये व चषक, चरी येथील जय हनुमान व  रायवाडी येथील पांडबादेवी  या संघाला प्रत्येकी सात हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून पेझारी येथील म्हसोबा संघातील खेळाडू योगेश पाटील, उत्कृष्ठ चढाई केल्याबद्दल चरी येथील हनुमान संघातील खेळाडू सुजय थळे, उत्कृष्ट पक्कड म्हणून रायवाडी येथील पांडबादेवी संघातील संकेत बानकर या खेळाडूंना चषक देऊन गैारविण्यात आले.

अवश्य वाचा