नेरळ

   कर्जत-कल्याण रस्त्यावर शेलू गावाजवळ दोन दुचाकींचा आज 16 नोव्हेंबर रोजी सकाळी समोरासमोर धडक बसून अपघात झाला.या अपघातात दोन्ही दुचाकी वरील चार जण जखमी झाले असून एक गंभीर आहे.शेलू गावाच्या समोर यादव कुटुंबाचा म्हशींचा तबेला असून लक्ष्मण यादव-29,राजनाथ यादव-58 आणि किशन यादव-17 हे तिघे एका दुचाकी वरून आपल्या तबेल्यातून बाहेर पडले.त्यांच्या तबेल्यासमोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग हा दुपदरी रस्ता असून अगदी त्याच ठिकाणी हा रस्ता एकेरी होतो.वन विभागाने रस्ता करण्यास जमीन दिलेली नसल्याने त्या ठिकाणी हा रस्ता एकेरी बनला असून मोठ्या प्रमाणात अपघात त्या ठिकाणी होत असतात.यादव यांची दुचाकी आपल्या तबेल्यातून बाहेर पडली आणि त्याचवेळी वांगणी येथून दामत गावातील रहिवाशी असलेला तरुण नासिर धोंगरे-35 हा दुचाकीवरून येत होता.

   या दोन्ही दुचाकी या समोरासमोर येऊन एकमेकांवर आढळल्या आणि अपघात घडला.सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला असून त्यावेळी तेथून रिक्षा घेऊन नेरळ कडे येत असलेल्या रिक्षा चालकाने अपघातात जखमी झालेल्या चारही जखमीना आपल्या रिक्षात भरले आणि नेरळ कडे घेऊन येण्यास निघाला.त्या सर्वांना रिक्षा चालकाने नेरळ येथील डॉ हेमंत शेवाळे यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी आणले.डॉ शेवाळे यांच्याकडे त्या चारही जखमींवर प्राथमिक उपचार केले असून त्यातील किशन यादव या तरुणाचे मणक्याला मोठी गंभीर दुखापत झाली आहे.तर अन्य तिघे यांच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.याबाबत दामत येथील त्या अनोळखी रिक्षाचालक यांचे आभार यादव कुटुंबीयांनी मानले असून नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांनी देखील कौतुक केले आहे.जखमी वर आता खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून आपद्ग्रस्त टीम देखील अपघातानंतर घटना स्थळी पोहचली होती आणि त्यांनी देखील जखमींना मदत केली.

अवश्य वाचा