नेहरू नगर कुर्ला मुंबई.

   चेंबूर क्रीडा केंद्र, वंदे मातरम, आजरा स्पोर्ट्स यांच्या किशोरी गटातील विजयी सलामीने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या “ जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला” प्रारंभ झाला. किशोर गटात रेल्वे पोलीस बॉईज, लोकमान्य शिक्षण संस्था, हनुमान क्रीडा मंडळ यांनी विजयी सलामी दिली. नेहरू नगर – कुर्ला (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आजपासून दि. २५ नोव्हे.२०१९ पर्यंत सायंकाळच्या सत्रात या स्पर्धा रंगातील. किशोरी गटातील पहिल्या सामन्यात चेंबूर क्रिडा केंद्राने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा ५०-२४ असा सहज पराभव केला. मध्यांतराला २६-१६अशी आघाडी घेणाऱ्या चेंबूरने मध्यांतरानंतर देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. प्रांजल पवार, मयुरी जाधव या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

   दुसऱ्या सामन्यात वंदे मातरमने स्नेह विकासाचा धुव्वा उडविला तो रिया निंबाळकर, श्रेया तांबट यांच्या झंजावाती खेळाच्या जोरावर. मध्यांतराला वंदे मातरमकडे ३२-०४ अशी भलीभक्कम आघाडी होती. आजरा स्पोर्टसने राऊडी स्पोर्टसला ६६-०६ असे बुकलून काढले. विश्रांतीला ३५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या आजरा स्पोर्टसकडून कल्पिता शेवाळे, आकांक्षा बने यांचा खेळ उत्तम झाला.  किशोर गटातील सामन्यात रेल्वे पोलीस बॉईजने स्वयंभू मंडळाचा ५८-०६ असा धुव्वा उडविला. सुयश खरात, आर्यन डोंगरे यांच्या आक्रमक खेळाने रेल्वेने हा विजय सहज मिळविला. दुसऱ्या सामन्यात लोकमान्य शिक्षण संस्थेने चुरशीच्या लढतीत वक्रतुंड मंडकाचे आव्हान २८-२६ असे संपुष्टात आणले. पूर्वार्धात २१-१० अशी आघाडी घेणाऱ्या लोकमान्यला उत्तरार्धात मात्र कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला.

   पण पूर्वार्धात ११ गुणांची घेतलेली आघाडी त्यांच्या कामी आली. मयांक दिवाण, विनीत गायकवाड लोकमान्यकडून, तर राम देवरे, निखिल दवणे वक्रतुंडकडून उत्कृष्ट खेळले.सामन्यांचे उदघाटन मुंबई उपनगर कबड्डी असो. चे नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल गजानन कीर्तिकर यांच्या शुभहस्ते करण्यात असले. तडप्रसंगी आमदार मंगेश कुडाळकर, कुर्ल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे, नगरसेविका मनीषा मोरजकार, उपविभाग प्रमुख संदिप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सुघाकर घाग, रमेश हरयाण, प्रताप शेट्टी यांनी केले.

अवश्य वाचा