खेड

   मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दि १४ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंप समोर लोटे येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.या अपघात संदर्भात खेड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्रकुमार श्रीरामपत प्रजापती(वय २१, रा.कळंबोली नविमुंबई) हा  १४ रोजी आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच४६एच००१२) घेऊन लोटे येथून मुंबईच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता.

   खेड तालुक्यातील भरणे येथे सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंप येथून दुचाकी(एमएच०८एबी२४१७) वर स्वार होऊन फकरुद्दीन हुसेनसाब मुजावर (५०, मूळ कर्नाटक सध्या भरणे) हा महामार्गावर येत असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकीसह मुजावर कंटेनरच्या मागील डाव्याबाजूच्या चाकाखाली चिरडला गेला. या अपघातात मुजावर याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम करत आहेत.

अवश्य वाचा