कशेळे-

   कर्जत तालुक्यातील शासकिय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस येथे आदीवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प पेण च्या अंतर्गत प्रकल्पस्तरिय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उद्घघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा  प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या  शुभहस्ते करण्यात आले.

   या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डामसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी के.बी खेडेकर ,एस.एन.शरमकर,शिक्षक संघटना अध्यक्ष सतिष किर्वे मुख्याध्यापक संजय मागाडे आदीमान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुञसंचालन एल.एस.भिसे व एस.एम.नाईक यांनी केले.या तीन दिवस चालणा-या क्रिडा स्पर्धेत कब्बडी , खो खो , हाॅलीबाॅल ,हॅण्डबाॅल,धावणे,थालीफेक ,गोळा फेक ,उंच उडी ,लांब उडी आदी खेळांचे आयोजन केले आहे. एकुण २४ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला असुन १२६० खेळाडूंनी सहभाग दर्शवला आहे. त्यासाठी २०० शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत.या तिन दिवसीय प्रकल्प स्तरिय स्पर्धेतील विद्यार्थ्याच्या भोजन व निवासाची व्यवस्था पिंगळस आश्रम शाळेचे अधिक्षक  राजिव खारकंडे हे करत आहेत.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.