कोल्हापूर, १४ नोव्हेंबर २०१९:

   बांधकाम उद्योगक्षेत्रामध्ये आलेल्या तेजीमुळे रेतीला असलेल्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने भारतातील अनेक भागांमध्ये नदीपात्रातील रेतीचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर रेतीसाठी नदीमध्ये चालणा-या खाणकामामुळे नदीपात्राच्या प्रवाहातही असंतुलन निर्माण होत असल्याने भविष्यकाळातील पुराची शक्यताही वाढते. निसर्गाची खालावणारी स्थिती, रेतीच्या गगनाला भिडणा-या किंमती आणि वरील सर्व घटकांमुळे मॅन्युफॅक्चर्ड सँड म्हणजे एम सॅँडच्या वापराला उभारी मिळाली आहे.महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये एम-सँडच्या वापरामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे व सध्या राज्यातील एकूण वाळू वापरामध्ये ४०-५०% वाटा हा या प्रकारच्या वाळूचा आहे. मॅन्युफॅक्चर्ड सँड हा बांधकाम क्षेत्राचे जणू भवितव्य बनला आहे. या सर्व बाबी ख-या असल्या तरीही एम सँडच्या काही विशिष्ट मर्यादा आहेत. उदा. या वाळूला नदीतील सर्वसामान्य वाळूच्या तुलनेत २५-३०% अधिक पाणी लागते.

   या वाळूमध्ये काही सूक्ष्म आकाराचे कण मोठ्या संख्येने असतात, जे स्क्रीड किंवा कॉक्रीटची बळकटी आणि कार्यक्षमता यांच्यावर परिणाम करू शकते. एम-सँडची मिसळण्याची क्षमता नैसर्गिक वाळूइतकी नसते व तिचा वापर असलेल्या भिंतींमध्ये सुकल्यावर पडणा-या मोठ्या भेगांचेही प्रमाण खूप जास्त असते, ज्यांना हनिकोम्ब असे म्हटले जाते.एम-सँडच्या वापरासंबंधीच्या या अडचणी सोडविण्यासाठी बांधकाम आणि वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रातील जाणकार मानल्या जाणा-या डॉ. फिक्सिटने एलडब्‍ल्‍यू+ सुपर नावाचे एक क्रांतीकारी उत्पादन बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एलडब्‍ल्‍यू+ सुपर एम-सँडमध्ये मिसळल्याने तिचा दर्जा वाढतो, ज्यामुळे इमारतीचे आयुर्मान वाढते.एम-सँडमध्ये एलडब्‍ल्‍यू+ सुपर मिसळण्याचे ४ अव्वल फायदे म्हणजे, या मिश्रणात ३०% पाणी कमी उरत असल्याने क्रश्ड रेती आणि काँक्रिट यांच्या मिश्रणाची कार्यक्षमता वाढते, काँक्रीटमधील स्टील गंजणे रोखले जाते, इमारतीची बळकटी व टिकाऊपणा वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँक्रिंट आणि रेतीचे मिश्रण वॉटरप्रूफ बनते. याचे प्लास्टरसारखा परिणाम साधणारे गुणधर्म मिश्रणाला एकसंध ठेवतात व त्यातील घटकांना अलग होण्यापासून रोखतात. यामुळे हे मिश्रण पृष्ठभागावर अधिक चांगल्या प्रकारे लिंपले जाते व प्लास्टरमध्ये तुलनेने कमी भेगा पडतात व प्लास्टर करताना ते खाली पडल्याने होणारे नुकसान ५० टक्‍क्‍यांनी कमी होते. हे उत्पादन सिमेंट, काँक्रीट, प्लास्टर्सचे क्युअरिंग झाल्यानंतरची त्यांची अंतर्गत जलरोधकता वाढवते व त्यामुळे इमारतीचे आयुर्मान वाढते.

   पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या कन्स्ट्रक्शन केमिकल्स (किरकोळ)चे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. निलेश मजुमदार म्हणाले, ''कोल्हापूर ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आमच्या अंदाजानुसार येथील १०% हून कमी घरांमध्ये वॉटरप्रूफिंगच्या आधुनिक रासायनिक पद्धतींचा वापर होतो. नाविन्यपूर्ण आणि काळाला साजेशा तंत्रज्ञानाने सुसज्ज असे तंत्रज्ञान आणत व त्याचवेळी पर्यावरणाशी इमान राखत आपल्या लाभार्थींना आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. डॉ. फिक्सिट एलडब्‍ल्‍यू+ सुपरच्या बाजारपेठेतील आगमनाच्या निमित्ताने आम्ही कोल्हापूर बाजारपेठेला एक अभिनव उपायतंत्र देऊ इच्छितो, जे एक टिकाऊ बांधकाम उभे करण्यास मदत करेल. हे एका खास फॉर्म्युल्यातून निर्माण झालेले उत्पादन आहे.

   खास एम-सँडसाठी, तिची कार्यक्षमता व परिणामकारकता वाढविण्यासाठी तसेच या साहित्‍याच्या मर्यादा पार करण्यासाठी हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. पाणी गळणे आणि भिंतीतील ओलाव्याच्या प्रश्नांकडे डॉ. फिक्सिटमध्ये आमच्याकडे योग्य ती उपाययोजना उपलब्ध आहे. ग्राहकांनी नव्या पिढीच्या एलडब्‍ल्‍यू+ सुपर सारख्या योग्य उत्पादनांची निवड करण्याचे तसेच इमारतीचे आयुर्मान वाढविण्यासाठी बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच संपूर्ण वॉटपप्रूफिंग करून घ्यावे, असे आवाहन आम्ही आमच्या ग्राहकांना करतो.'' 

अवश्य वाचा