पनवेल :

   तालुक्यातील ८ ग्रामपंचायतच्या पोट निवडणूका ८ डिसेंबर रोजी पार पडत आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे.  मतमोजणी ९ डिसेंबर रोजी आहे. यावेळी तहसील कार्यालयाकडून खबरदारी घेण्याचे येणार आहे.

   तालुक्यात पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. कुंडेवहाळसाठी १, आपटासाठी १, वाकडीसाठी १, चिखलेसाठी १ , गव्हाणसाठी ४, वडघरसाठी १, तरघरसाठी १, उलवेसाठी २ जागांवर मतदान होत आहे. ८ ग्रामपंचायतमध्ये १२ जागांसाठी पोट निवडणूक होत असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अर्ज भरण्याची  तारीख १६ ते २१ नोव्हेंबर असून २२ नोव्हेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख २५ नोव्हेंबर आहे. ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पोट निवडणुकीत नामनिर्देश पत्र मागविण्याची तारीख 16 ते 21 नोव्हेंबर रविवार वगळून अंतिम मुदत असून 22 नोव्हेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. उमेदवारांसाठी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी 8 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका पार पडल्यानंतर 09 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

अवश्य वाचा