मोहोपाडा-

   शिक्षण व खेळासाठी वेळ व महत्त्व द्या असे आवाहन खालापूर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी केले आहे.वावंढळवाडी येथील हनुमानमंदिरात काकडा आरती समाप्ती च्या दीपोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले घरच्या मोठया माणसांनी सतत टीव्ही सुरू ठेवणे व मुलांच्या हातात मोबाईल असणे यामुळे क्रीडा व शैक्षणिक क्षेत्र मागे जात आहे,आपल्या परिसरात उद्योगपती,प्रशासकीय अधिकारी,ऑलिम्पिक साठी क्रीडापट्टू तयार होणे काळाची गरज आहे,यासाठी मार्गदर्शन करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी चौक चे सपोनि.संजय बांगर उपस्थित होते.हभप.

   कमलाकर काईनकर यांनी सुरू केलेल्या या कार्यक्रमाला २४ वर्ष झाली.रामदास काईनकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुण व महिलांचा सहभाग या कार्यक्रमात असतो,त्यांना भिलवले,कांढरोली,आसरेवाडी,वावंढळ व विणेगावं गावातील वारकरी-माळकरी यांची साथ असते.यावेळी वन रक्षण,प्लास्टिक मुक्ती,छत्रपती शिवाजी महाराज,वेसणमुक्ती,स्वच्छता,रागावर नियंत्रण,एकीचे बळ या विषयावर लहान मुलांनी भाषणे केली.सतत महिनाभर सुरू असलेल्या काकडा आरतीने गावातील वातावरण भक्तिमय झाल्याचे ग्रामस्थ यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

अवश्य वाचा