बोर्ली पंचतन-

   रायगड जिल्ह्याती ल प्रमुख श्रद्धा स्थळांपैकी एक दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचा 23 वा प्रकट दिन सोहळा आज संकष्टी चतुर्थी च्या दिवशी सालाबाद प्रमाणे करण्यात येणार आहे . 2014 मध्ये सुवर्ण गणेशाची मूर्ती दरोडेखोरांनी रक्त रंजीत ब्दरोडा टाकून चोरी केली होती
पोलिसांच्या तपासाने चोरांना पकडण्यात यश आले परंतु अद्याप सुवर्ण गणेशाचा ऐवज  सध्या पुन्हा मिळविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया चालु असून पुढील कालावधी मध्ये सुवर्ण गणेश पुन्हा प्रतिष्ठापित होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहेदिवेआगर येथील सुवर्ण गणेश 17 नोव्हेंबर 1997 साली संकष्टी चतुथीच्या दिवशी कै द्रौपदीबाई पाटील यांच्या नारळ सुपारीच्या बागेमध्ये प्रकट झाले आज याच घटनेला 22 वर्ष पूर्ण झाले असून दरवर्षी प्रकट दिन मोठ्या उत्सहा च्या वातावरणामध्ये संपन्न होत असतो यावर्षी देखील प्रकट दिना निमित्त संकष्ट चतूर्थीच्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वा गणपति देव व पूजेची नेमणूक ट्रस्टचे विश्वस्त भालचंद्र महादेव चोगले व सौ मुकता भाल चंद्र चोगले यांच्या शुभहस्ते गणेश मूर्तीची महापूजा करण्यात येणार आहे तसेच सकाळी 7:30 वा  ब्रह्म वृन्दाची आवर्तने, सकाळी 10 वा. राजेंद्र मांडेलवाल मुंबई यांचे कीर्तन, सायंकाळी 4 वा. महिलांसाठी हळदीकुंकू त्याचप्रमाणे शनिवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा सत्य नारायणाची महापूजा व 12 वा महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत तरी भक्तगणांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष महेश पिळणकर यानी केले  आहेत. 

   सुवर्ण गणेश चोरी झाल्या नंतर पुन्हा गणेशाचे सोने ट्रस्ट कडे केव्हा मिळेल व सुवर्ण गणेश पुन्हा प्रतिष्ठापित होईल या प्रतीक्षेत भक्त गण आहेत महेश पिळणकर अध्यक्ष गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट दिवेआगर" महाराष्ट्र शासनाकडून मूर्तीचे ऐवज मिळण्याकामी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून उचच न्यायालय यांचेकडे आम्ही ट्रस्ट ने ऐवज मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असून पुढील काळावधीमध्ये न्यायालयीन निकाल नंतर ऐवज मिळाल्यनंतर सुवर्ण गणेश प्रतिस्थापित होतील अशी आशा आहे.

अवश्य वाचा