बेळगाव,दि.१४-

   कर्नाटक विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.एकूण चौदा उमेदवार भाजपने जाहीर केले असून यादीत अपात्रांना स्थान देण्यात आले आहे.बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी पोट निवडणूक होत आहे.अथणी मधून महेश कुमठळ्ळी याना,गोकाकामधून रमेश जारकीहोळी याना तर कागवाडमधून श्रीमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

   सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिल्यामुळे त्यांनाच उमेदवारी भाजपने दिली आहे.अथणी मतदार संघातून उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना तिकीट देण्याची चर्चा होती. महेश कुमठळ्ळी यांना विधान परिषदेवर घ्यायचे ठरत होते पण सवदी यांना पक्षाने अथणी मधून उमेदवारी दिलेली नाही.त्यामुळे सवदी यांना विधान परिषदेवर घेतले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.बहुचर्चित गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे अशोक पुजारी नाराज असून ते कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

अवश्य वाचा