मुरुड जंजिरादिनांक १४-११-२०१९

   सर्व सामान्यांना सोप्या पद्धतीने लवकर कर्ज मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आदर्श पतसंस्था असुन आर्थिक व्यवहार करीत असतांना सामाजिक जाणीवांचे भान पतसंस्थेने स्थापनेपासुनच जोपासले आहे .पतसंस्थांच्या निकोप  विस्तार सहकार क्षेत्राला निश्चितपणे स्थैर्य  देईल असा विश्वास आदर्श पतसंस्थेचे  उपाध्यक्ष सतिष प्रधान यांनी व्यक्त केला .आदर्श पतसंस्था , अलिबाग च्या मुरुड शहरातील 10 व्या शाखेच्या उद्घघाटनप्रसंगी उपस्थितांशी संवाद करतांना प्रधान बोलत होते .

   या प्रसंगी व्यासपीठावर  आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील,मुरूड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर , माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील , नगरसेवक अशोक धुमाळ, प्रमोद भायदे , रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष दिलीप जोशी , हसमुख जैन , नितीन अंबुर्लें, हिम्मत लाल जैन , मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी पाटील, सचिव कैलास जगे आदी मान्यवर उपस्थित होते .सतिष प्रधान यांनी आपल्या भाषणात आदर्श पतसंस्थेचा आढावा घेतांना  सांगितले की, पतसंस्थेकडे १६१  कोटींच्या ठेवी , १२०  कोटी कर्जे ७५००  सदस्य संख्या असुन ऑडिट वर्ग अ प्राप्त संस्था १२  टक्के लाभांश  वितरीत करते . संस्थेवर ठेवीदारांचा संपूर्ण विश्वास असल्याने २१  व्या वर्षात यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले .

   उदघाटन प्रसंगी नगराध्यक्ष स्नेहा पाटील  म्हणाल्या की, आदर्श पतसंस्थेचा कारभार पारदर्शी असुन सातत्याने  या संस्थेची उत्तरोत्तर  प्रगती होत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या . त्यांच्या शुभहस्ते मिनी एटीएम सेवेचा शुभारंभ करण्यात आला.माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर म्हणाले की , राष्ट्रीय कृत बँकेत सर्वसामान्य माणसाला कर्ज मिळविण्यासाठी अत्यंत कसरत करावी लागते . या उलट पतसंस्थेच्या माध्यमातुन त्याची आर्थिक गरज भागवली जाते . त्याच सहकार्याच्या भूमिकेतुन आदर्श पतसंस्था सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असल्याचा निर्वाळा देत नवीन शाखेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या .शेवटी सचिव कैलास जगे यांनी आभार प्रदर्शन केले .सदरहू कार्यक्रमास मुरूड मधुन विविध स्तरांतुन नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती .

 

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत