मुरुड जंजिरा 

   १४ नोव्हेंबर म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते होते. पंडित नेहरूंना मुले फार आवडतात म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे। आजचा दिवस सर्वत्र भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.आज दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड-जंजिरा महाविद्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक,. आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक,, . प्रशांत सुबनावळ , हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंजुमन इस्लाम जंजिऱ्याचे खजिनदार . अल्ताफ मलिक यांनी भूषविले.

   महाविद्यलाय विकास समितीचे सदस्य . इस्माईल शेख, महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी, अंजुमन हायस्कुल चे प्राचार्य जाहिद गोठेकर व मुरुड पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.आज बालदिनाच्या अनुषंगानेमहाविद्यालयातर्फे अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कुल मुरुड मधील इयत्ता ५ वी, ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व उर्दू भाषांमध्ये निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या बाळ स्पर्धकांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.पोलीस निरीक्षक आर. पी. पवार,, यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी स्व: अनुभव सांगून ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच त्यानी उपस्थित गुन्हे व कायदे याबद्दल जाणीव करून दिली. महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सर्व विद्यार्थाना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या व आयुष्यात सतत प्रयत्नशील राहून उच्चस्तरावर पोहचण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी अंगिकारले पाहिजे असे प्रतिपादन केले.

   बालदिन निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. साजिद शेख व डी. एल. एल.  इ. विभाग प्रमुख प्रा. सोनाली पवार यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांमध्ये निदा गोरमे, नादिया दामाद, सफा दरोगे, अमिषा पाटील, सोनल पाटील, उझ्मा उलडे, दिशा घोष, तंझिल उलडे, उमर कबले आदींनी विशेष सहकार्य केले.

 

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,