नेरळ
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असल्याने याच दिवशी बालदिन साजरा होतो.या बालदिना निमित्त येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,शिक्षण सभापती संदीप कदम व माजी शिक्षक सुनील कदम हे उपस्थित होते.
माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळा आणि प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या दरम्यान या बालदिनाचे महत्व नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व शिक्षण सभापती यांनी विध्यार्थ्यांना समजावले.सर्व विध्यार्थ्यांना नगराध्यक्षा सावंत व शिक्षण सभापती संदीप कदम यांच्या तर्फे खाऊ चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी दोन्ही शाळेचे शिक्षकवृंद,मुख्याध्यापक व विध्यार्थी उपस्थित
होते.
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group