उरण

   ‘पंडित जवाहरलाल नेहरु’ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यु.ई.एस.स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेज मधील सर्व विभागातील विदयार्थ्यांसाठी विविधरंगी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विदयार्थ्यांसाठी ‘ वेशभूषा ’ स्पर्धेचे आयोजन केले होते.  विदयार्थ्यांना शाळेने दिलेल्या विविध विषयानुसार सर्व विदयार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतल्याची जाणीव विदयार्थ्यांच्या विविध वेशभूषा पाहून होत होती.

   तसेच पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व ज्यु.कॉलेज विभागातील विदयार्थ्यांसाठी कविता वाचन, गायन, कथा सांगणे, निबंध स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा, भाषण, मास्क मेकिंग, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, स्केचिंग, नृत्य, वादन, स्टँन्डप कॉमेडी, विनोदी लघु नाटिका  तसेच रांगोळी, मेहंदी, पॉट पेन्टींग अश्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.विदयार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये मोठया प्रमाणात सहभाग घेऊन स्पर्धा रंगारंग व रंगतदार केली. म्हणूनच  सर्व कमिटी मेंबर्स स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स यांनी विदयार्थ्यांच्या  ह्या  प्रयत्नांना मनापासून दाद दिली व त्यांचे तोंडभरुन कौतुक केले.

अवश्य वाचा