बोर्ली पंचतन

   प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणा-या रस्त्याची वाट अतिशय बिकट झाली असुन अपघाताला कवेत घेण्यागत झाली आहे.गेली अनेक वर्षे हा रस्ता खितपत पडला असुन तो दुरुस्त झालेला नाही.या रस्त्याकडे जाणारी वाहन चालक आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन जात असतात. बोर्लीपंचतन विभागातील सर्व मोठी शाळा मोहनलाल सोनी विद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुलाच असल्याने हा परीसर शाळेच्या मुल मुलांनी गजबजलेला असतो. विद्यार्थी शाळेला येत असताना सायकलवर येतात परंतु रस्ताच खराब असल्यामुळे अनेकदा मुल पडुन त्यांना इजा होते. लहान मुलांना शाळेत सोडायला पालक घाई गडबडीत येत असतात,त्यात महीला चालकही असतात, परंतु एस टी स्टॅंड पासुन देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता हा जीवघेणा बनला असुन अनेक अपघात होत आहेत.प्रत्येकाला जीव मुठीत घेऊन त्या रस्ताने जावे लागते.अनेक वेळा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणुन ग्रामस्थांनी मागणीही केली आहे पण त्या मागणीला यश आले नाही. मोठे अपघात होण्याआधीच संबधित विभागाने जागे होऊन तो त्वरीत नव्याने बनवुन घ्यावा अशी सर्वच थरातुन मागणी जोर धरु लागली आहेबोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता हा रुग्णांना तापदायक ठरला आहे.

   विशेषतः गरोदर महीला आठ दिवसात चिकित्सा करण्यासाठी शासकीय रुग्णालयात येत असतात परंतु त्यांना रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असुन दवाखान्यापर्यंत पायी जावे लागते.महीलांची होणारी ही दुर्दशा लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी परीसरातील सर्वच नागरीकांकडुन होत आहे.लोकप्रतिनिधींनी रस्ता पुर्णपणे दुरुस्त करण्याची मागणी करून होणारे अपघात वेळीच टाळावेत. अन्यथा वेळ प्रसंगी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एखादी महीला वाहनाने प्रसुती काळात येत असेल तर त्या रस्त्यावरून जात असताना तिला आपल्या जीवाशी खेळ करुन जावे लागते. कारण आता रस्ताच मुळ जागेवर शिल्लक राहिलेला नाही. नागरीकांकडुन आता रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा हीच मोठी मागणी आहे.

   "बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या वतीने अनंत गीतेंकडे रस्ताची मागणी केली होती.परंतु अद्यापही त्याचे मंजुरी पत्र आम्हाला मिळाले नाही.आता नव्याने माननीय खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्याकडे ग्रामपंचायतीकडुन एस टी स्टॅंड ते प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून चिंचबादेवी मंदिरापर्यंतचा रस्ता व्हावा ह्यासाठी मागणी केली आहे .व ती लवकरच मंजूर होईल.त्यामुळे महीलांसहीत शाळेच्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास लवकरच कमी होईल "" प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता हा मागील ग्रामसभेत ठराव मंजूर करुन पंचायत समिती श्रीवर्धन येथे पाठविला असुन तो रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे मंजुरी करीता गेला आहे. लवकरच रा. जि. परिषदेच्या सभेत मंजुर होऊन कामाची ऑर्डर मिळेल. आचारसंहीतेमुळे तो प्रस्ताव मंजूर झाला नाही.वास्तविक तो रस्ता अनेक वर्षे दुर्लक्षित आहे.परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातुन तो आम्ही लवकरच बनवुन मुल महीला व लोकांना होणारा त्रास दुर करु. "

अवश्य वाचा