भाकरवड

   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग व शासकीय माध्यमिक शाळा कोळघर यांच्या संयुक्त विद्यमाने कोळघर आश्रमशाळा येथे गुरुवार दि 14 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत  मोठ्या उत्साहात बालदिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरु व शारदा मातेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, जिल्हा विधी प्राधिकरण निहा राऊत,देवेंद्र केळुसकर, ऍड, गीता म्हात्रे, पर्यवेक्षक  सामीया पेरेकर,पोलीस ठाणे पोयनाड चे जे.जे.रॉडरीज,वरिष्ठ लिपिक मगर मॅडम,दर्शन म्हात्रे,निलेश थळे,पत्रकार जीविता पाटील,हर्षला तरे, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे महत्त्व व बालकांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांविषयी माहिती पत्रकार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रशिक्षित स्वयंसेविका जीविता पाटील यांनी दिली. तसेच ऍड गीता म्हात्रे यांनी सखी वन्स स्टॉप सेंटर च्या माध्यमातून असणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच उत्कृष्ट समालोचक देवेंद्र केळुस्कर यांनी मुलांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शक डॉ. निहा राऊत यांनी गुड टच व बॅड टच या विषयावर अनेक उदाहरणे देऊन मुला मुलींना मार्गदर्शन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास 300 हुन अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम पी पाटील यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग,कर्मचारी वर्ग यांनी केले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बालदिनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सुसज्ज नियोजन करण्यात आले त्या बद्दल जिल्हा विधी प्राधिकरण च्या वरिष्ठ लिपिक प्रणिता मगर यानी केल्या बद्द्ल दर्शन म्हात्रे यांनी आभार व्यक्त केले

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.