राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन मराठी विज्ञान परिषद आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नववे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन दि. १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मानखुर्द येथे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. भगवान चक्रदेव भूषविणार आहेत. या संमेलनात राज्यभरातून १६२ विद्यार्थी आणि ३८ शिक्षक सहभागी होणार आहेत.

   व्ही.डी. चौगुले पारितोषिक विजेते विद्यार्थी व्यासपीठावरून आणि  त्या व्यतिरिक्त निवड झालेले एकूण १०४ प्रकल्प या संमेलनात सादर होतील. त्याव्यतिरिक्त सप्रयोग व्याख्यान, विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिके, द्रव नत्राचे प्रयोग, अभिनव निर्मिती कृतीसत्रे आणि नेहरू विज्ञान केंद्राची सफर इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल आहे. संमेलनाचे उदघाटन परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते होणार असून होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे डॉ. के. सुब्रमण्यम आणि इतर मान्यवर उपस्थित असतील. 

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.