पेण दि.13.

    पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या स्वररंगच्या पेण फेस्टिवलमध्ये दररोज विविध स्पर्धा होत असून बुधवारी मोठ्या उत्साहात 13 वर्षावरील मोठ्या गटाच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत ओमकार माळवी यांनी बहारदार नृत्य अविष्कार सादर करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले तर नेहा पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक विजेता प्रशांत रहाटे हा ठरला तसेच राहुल सोळंकी व शुभम रसाळ यांना उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर देण्यात आली.

    पेण तालुक्यासह रायगड, रत्नागिरी, मुंबई, उरण, माणगाव आदी विविध भागातील एकूण 21 स्पर्धकांनी या नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता. सर्व स्पर्धकांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर करून रसिकांचे मनोरंजन केले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दम दमा दमचे निर्मिती व्यवस्थापक बसुराज गुरव (मुंबई) व सौ रेश्मा थळे-पाटील (पेण) यांनी काम पाहिले.

अवश्य वाचा