पेण

   दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व' निर्माता आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत 'फत्तेशिकस्त' या मराठी चित्रपट प्रिमियर शो कार्यक्रम प्रसंगी आज सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रात करत असलेल्या दुर्गसंवर्धन कार्याची दखल घेऊन कौतुक करण्यात आले तसेच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष श्रमिक धन्वंतरी व कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पेण चे माजी नगरसेवक व सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे उपाध्यक्ष समिर म्हात्रे तसेच पुणे येथील  सहकारी उपस्थित होते. फर्जंन या मराठी चित्रपटाच्या अफाट यशानंतर नुकताच १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याचे दरम्यान मुंबई लोअर परेल येथील फोनिक्स मॉल मध्ये(आज १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या) 'फत्तेशिकस्त'या मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमियर शो संपन्न झाला.

   या कार्यक्रमा प्रसंगी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व मान्यवर आयोजकांच्या वतीने महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान करत असलेल्या दुर्गसंवर्धन कार्याचे कौतुक करत माहिती देताना प्रत्यक्ष गड किल्ल्यांवर जावून मातीमध्ये हात घालून, किल्ल्यांची वाट चढताना ढोपर फोडून घेऊन काम करणारे आणि गड किल्ल्यांसाठी खऱ्या अर्थाने झटणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे  आहेत तसेच गड किल्ले संवर्धन क्षेत्रामध्ये हुकूम म्हणून ओळखले जाणारे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक श्रमिक धन्वंतरी आणि कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी ९००पेक्षा संवर्धन मोहीम केलेल्या आहेत तर ८किल्ल्यांना वर्गणी व स्वतःच्या व कार्यकर्त्यांच्या खिशातून पैसे खर्चून भक्कम दरवाजे बसवण्यात आले आहे तर २५ किल्ल्यांमधील मातीत गाडल्या गेलेल्या तोफा उचकडुण बाहेर काढून स्वच्छ करून तोफगाडे देऊन उभे केले आहेत असे गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान कार्यकरत असल्याने कौतुक करण्यात आले.यावेळी अभिनेते चिन्मय मांडलेकर,र्मिनल कुलकर्णी, अनुप जोशी, अंकिता मोहन, मृण्मयी देशपांडे, निखिल राऊत,समीर धर्माधिकारी,दिग्दर्शक निर्माते आदि उपस्थित होते.

अवश्य वाचा