महाड-दि.१४ नोव्हेंबर

   महाड महसुल विभागांतील जमीन विक्री फसवणुक प्रकरणांमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी दोषी असल्याचा ठपका शहर पोलिसांनी ठेवला आणि वरील दोनही कर्मचाNयांन अटक करण्याची कारवाई केली.सदरची कारवाई योग्य नसल्याचा आरोप तलाठी संघटनेने केला आणि सोमवारी काळ्या फिती लाऊन या घटनेचा निषेध केला.अद्याप या प्रकरणी कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यांत आली नसल्याने अखेर महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शैलेश सणस यांनी केलेली कारवाई सुड भावनेंतुन केली असलयाचा आरोप करीत संघटनेने काम बंद आंदोलनाला सुरवात केली असल्याची माहिती रायगड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष संतोष जांभळे यांनी दिली.

   महाड शहर पोलिस ठाण्या मध्ये नांदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमीन व्यवहार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यांत आला असुन या गुन्ह्यामध्ये मंडल अधिकारी सुग्रास जामसिंग सोनावणे यांना अटक करण्यांत आली.त्याच बरोबर महसुल कर्मचारी राजेंद्र उबारे यांचे नाव देखिल समाविष्ट करण्यांत आले आहे.या कारवाई विरोधांमध्ये तलाठी संघटनेने जाहिर निषेध व्यक्त करुन सोमवारी काळ्या फित लाऊन काम केले.त्या नंतर रायगड जिल्ह्यांतील सर्व तालुका संघटनेने या आंदोलनाला पाठींबा असल्याचे जाहिर केले.आणि महाड पोलादपुर संघटनेने येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन सादर केले.

   महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शैलेश सणस यांना निलंबित करण्याची मागणी संघटनेने केली असुन जो पर्यत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यांत येत नाही त्याच बरोबर सणस यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जात नाही तो पर्यत काम बंद आंदोलन सुरु करण्याचे जाहिर करण्यांत आले.सणस यांनी आपल्या पदाचा गैर वापर करुन कारवाई केली असल्याचा आरोप संघटनेने केला असुन सोनावणे यांना अटक करण्यांत आलेली कारवाई देखिल नियम बाह्य असल्याने आंदोलन करण्यांत येत असल्याचे सांगण्यांत आले.सणस यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालया समोर संघटने तर्पेâ एक दिवशीस उपोषण करण्यांत आले.

अवश्य वाचा