महाड-दि.१४ नोव्हेंबर

   येत्या कांही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणांत वेंâद्र सरकारच्या विविध विभागा करीता १० आणि १२ व अन्य कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्था करीता जागा जाहिर करण्यांत आल्या आहेंत.त्याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना व्हावी या साठी महाड येथील कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने रविवार दि.१७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये भव्य सेमिनारचे आयोजन विकास सावंतस् अ‍ॅकेडमी तर्पेâ करण्यांत आले आहे.या सेमिनारचा अधिकाधीक विद्यार्थी विद्यार्थानी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.महाड मधील कोकण कडा मित्र मंडळाने पालक आणि विद्यार्थाना उपयुक्त असणाNया सेमिनारचे आयोजन करण्या करीता पुढाकार घेतला असुन याचा लाभ कोकणांतील तरुणांना मिळावा या उद्ेशाने उपक्रम राबविण्यांत येत असल्याचे कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश  पवार यांनी सांगितले.

   येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यांत आलेल्या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील तज्ञ उपस्थित राहाणार आहेंत.भरती साठी अर्ज करण्याच्या सुचना,अर्ज करण्याची मुदत,वयो मर्यादा,निवड प्रक्रिया असणाNया कामाचे स्वरुप, इत्यादी विविध विषयांचे मार्गदर्शन सेमिनार मध्ये करण्यांत येणार आहे.त्याच बरोबर या वर्षी १२ वी तसेच कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थाना दर वर्षी वेंâद्र शासना कडून रेल्वे,पोष्ट ऑफिस,विमा वंâपन्या,सरकारी बँका,यांतुन नोकरीची संधी उपलब्द कयन देण्यांत येते.त्या साठी विद्यार्थानी नेमके काय करावे याचे मार्गदर्शन करण्यांत येणार आहे.तसेच डीसेंबर २०२० पर्यत जाहिर झालेल्या १९ बॅका मधील विविध पदा साठीच्या भरती तारखां विषयी माहिती दिली जाणार आहे.या सेमिनारमध्ये प्रामुख्याने विद्यार्थानी त्याच बरोबर पालकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.