पनवेल, दि.14

   गेल्या काही दिवसापासून खारघर परिसरात म्हशींना गुंगीचे इंजेक्शन देवून त्यांची तस्करी करण्याचे प्रकार वाढीस लागले असून याप्रकरणी पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.येथील से.21 जवळील श्री रविशंकर शाळेसमोरील मोकळ्या जागेत दोन म्हशींना गुंगीचे औषध दिल्याने या म्हशी त्याच ठिकाणी पडून होत्या.

   परंतु स्थानिकांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या तस्करीचा डाव उधळून निघाला. असाच प्रकार परिसरात सुरू असून रात्रीच्या वेळेस मोकाट फिरणार्‍या गायी म्हशींना गुंगीचे इंजेक्शन देण्याचे प्रकार सुरू आहेत व एका टेम्पोत भरुन त्यांना अज्ञातस्थळी नेले जात आहे. या संदर्भात स्थानिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.

अवश्य वाचा