पनवेल, दि.14

   तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये एका हायड्राची भिंतीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.बालाजी वेअर हाऊसमध्ये एका ट्रकमधील स्टीलच्या कॉईल हायड्राच्या सहाय्याने खाली करीत असताना त्यावरील चालकाने हयगय केल्याने हायड्राचा भिंतीला धक्का लागला व त्यात तेथे असलेले अरुण पवार यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यात ते जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अवश्य वाचा