पनवेल, दि.14 

   पनवेलमध्ये सध्या द ग्रेट भारत सर्कस अवतरली असल्यामुळे करमणुकीचा आनंद घेण्यासाठी पनवेलमधील नागरिक मोठ्या उत्साहात सर्कसकडे वळत आहेत. यावेळी पनवेलमधील गोरगरीब मुलांना सर्कस दाखविणे त्यांचा पालकांना जमत नसल्यामुळे या मुलांच्या चेहर्‍यावरही हसू फुलावे या हेतूने या लहानग्यांना सर्कस दाखविण्याचे आयोजन राजे प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख जयपाल पाटील यांनी सर्कस शो दाखविण्याच्या अगोदर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे या मुलांना दिले.

   म्हटले की बच्चे कंपनीसह सर्वच वर्गातील नागरिकांना त्याचे अधिक कुतूहल वाटत असत, या सर्कसमधील विदूषकाचे हास्याचे फवारे, उंचच्या उंच उड्या मारणार्‍या सुंदरी, वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ करून दाखवीत जनतेला हसविण्याचा विडा उचलणारी ही सर्कस असल्यामुळे त्याकडे सर्वचजण आकर्षित होत असतात. सर्कस आली की त्याचे 100, 200, 300 आणि 400 रुपये तिकीटदर गोरगरीब मुलांना न परवडणारे असल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य फुलविण्याचे काम मंगळवारी पनवेल रायगडच्यावतीने राजे प्रतिष्ठान यांनी केले. पनवेलमधील खांदा कॉलोनी येथील मैदानावर उभ्या राहिलेल्या या सर्कसमध्ये सुरु असलेल्या सर्कसमध्ये 100 मुलांसह त्यांच्याबरोबर आलेल्या दोन स्वयंसेवकांना या विशेष शो मध्ये सहभागी करण्यात आले होते.

   यावेळी रायगड अलिबाग येथील आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख जयपाल पाटील यांनी या मुलांना घरी वावरताना गॅस सिलेंडर पासून सुरू उभे राहणे, लाईटच्या बटणाचा वापर न करणे, 18 वर्षाखाली असताना वाहन न चालविणे, मोबाईल फोनचा वापर न करणे आदी बाबींबाबत किती भयानक घटना घडू शकतात याबाबत त्यांनी मुलांमध्ये जनजागृती केली. तसेच अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने न वागण्याबाबत त्यांना सांगितले. मुलांनाही हसत खेळवत सांगितलेल्या गोष्टी पाटल्या असल्याचे त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्सहनातून दिसत होते. यावेळी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, पनवेल तालुका अध्यक्ष राज भंडारी, महिला पनवेल तालुकाध्यक्षा प्रियांका पाटील, खांदा कॉलोनी अध्यक्ष किरण पालये, सचिन गणेचारी, सोनू, ऍड.संतोषी चव्हाण, सीमा पाटील, शोभा मिटगावकर, चित्रा भंडारी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्यावतीने या उपक्रमास गोरगरीब मुलांची ने - आण करण्याकरिता रिक्षासेवेची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, संतोष आमले, सचिव रामचंद्र चौधरी, पनवेल शहर अध्यक्ष शैलेश पवार यांच्यासह सहकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी द ग्रेट भारत सर्कसचे व्यवस्थापक मनोज पिल्लई यांनी केलेल्या सहकार्याबद्दल राजे प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गपूरविण्यात आले.
फोटो ः सर्कस

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.