पनवेल, दि.14 

   बालकामगारांना कामावर ठेवू नये, त्यांना शिक्षणापासून वंचित करू नये, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत या उद्देशाने बालकामगारांसाठी बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती फेरीचे आयोजन आज बाल दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातून शासनातर्फे करण्यात आलेे होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कामगार उपायुक्त रायगड प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाने ही फेरी काढण्यात आली होती. शहरातील महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणावरुन ही फेरी काढण्यात आली. यात सुरक्षा रक्षक, शासकीय महिला कर्मचारी, विविध संघटनेच्या माता-भगिनी सहभागी झाल्या होत्या. कामगार आयुक्त मुंबईचे महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने सध्या सर्वत्र बालकामगार प्रतिविरोधी जनजागृती उपक्रम सर्वत्र सुरू आहे.

   त्याअंतर्गत आज पनवेलमध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली होती. तसेच या संदर्भात माझा निर्धार, बाल व किशोरवयीन (प्रतिबंध व विभाजन) अधिनियम 1986 कामगार आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मार्फत स्वाक्षरी फलक ठेवण्यात आला होता. त्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून स्वाक्षर्‍या करून बालकामगार ठेवण्यास विरोध केला. अशा प्रकारची जनजागृती फलक लावून तसेच विविध उपाय योजना करून रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात व परिसरात करणार असल्याची माहिती कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली.

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,